लंडन - क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर असतानाच इंग्लंडच्या संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. अष्टपैलू मोईन अलीच्या फासळ्याला दुखापत झाल्याने तो पाकिस्तानविरुद्धच्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाही. त्याच्या जागेवर जोए डेनली याची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्व करंडकाच्या संघात मोईनची निवड करण्यात आली आहे.
मोईन अली हा गोलंदाजी सोबत फलंदाजीही करतो. इंग्लंडकडून त्याने ९१ सामन्यात प्रतिनिधीत्व केले असून त्यात त्याने ७८ बळी घेतले आहेत. सोबतच १ हजार ६४५ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३ शतके झळकावली आहेत. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने बंगळुरूच्या संघाकडून खेळताना छाप टाकली होती. त्याने आयपीएलच्या ११ सामन्यात २ अर्धशतकासंह २२० धावा आणि ६ बळी घेतले आहेत.
मोईनची दुखापत गंभीर असेल तर तो विश्वकरंडकाला मुकू शकतो. इंग्लंडच्या संघात त्याने नसणे हे इंग्लंडला मोठा धक्का बसू शकतो. यापूर्वीच अॅलेक्स हेल्स याने उत्तेजक द्रव्य घेतल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोईन अलीबाहेर पडल्यास इंग्लंडला दुहेरी झटका बसू शकतो.