लाहोर - पाकिस्तानच्या विश्वचषकातील संघात स्थान मिळवू न शकलेल्या मोहम्मद आमिर जवळ आणखी एक संधी आहे. विश्वचषकापूर्वी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला संधी मिळेल. त्यात त्याने चांगली कामगिरी केली तर तो संघात परतू शकतो, अशी प्रतिक्रिया कर्णधार सर्फराज अहमद याने दिली आहे.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तानाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेला रवाना होण्यापूर्वी अहमद पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.
अहमद पुढे म्हणाला की, आमिर जवळ इंग्लंड विरुद्धची मालिका एक चांगली संधी आहे. तो खूपच मेहनत घेत आहे. सराव शिबीरात त्याने चांगली गोलंदाजी केली. काल झालेल्या अभ्यास सामन्यात तो लयीत दिसून आला. त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी देऊ त्यात तो चांगली कामगिरी करु शकेल.
अहमद पुढे बोलताना म्हणाला, की आमच्या वेगवान गोलंदाजांसाठी ही जणू ही स्पर्धोच आहे. त्यांना आम्ही रोटेशन पॉलिसीद्वारे खेळविण्यात येईल. जेणेकरून त्यांच्यावर दबाव येणार नाही.