ETV Bharat / briefs

राहाता तालुक्यातील लोणी बु., मौजे खु. ही गावे कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित

तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर कुंदन हिरे यांच्या आदेशानुसार कन्टेन्मेंट क्षेत्रातील सर्व आस्‍थापने, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्तूविक्री इत्‍यादी 30 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रांत नागरिक आणि वाहनांना ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jul 18, 2020, 5:37 PM IST

Rahata
Rahata

अहमदनगर- राहाता तालुक्यातील मौजे पाथरे खु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात, मौजे पाथरे खु. आणि लोणी पाथरे बु. या गावांना कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

लोणी पाथरे बु. येथील विठ्ठलप्रभा सोसायटी व परिसर, सोनार गल्ली व परिसर कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रांमधील नागरिकांचे आगमन व प्रस्थान, तसेच वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तहसीलदारांनी आदेश जारी केले आहेत.

तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर कुंदन हिरे यांच्या आदेशानुसार कन्टेन्मेंट क्षेत्रातील सर्व आस्‍थापने, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री इत्‍यादी 30 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रांत नागरिक आणि वाहनांना ये-जा करण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहे.

आदेशात स्थानिक प्रशासनाने, कोअर एरिया प्रतिबंधित करणे, आत किंवा बाहेर जाण्याच्या मार्गवर बॅरिकेडिंग करणे, अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून येऊ शकणार नाही, प्रतिबंधित क्षेत्रात जाणारा व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे, प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तींची दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोड सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करणे, असे सांगण्यात आले आहे.

तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवसांपर्यंत घरोघरी सर्वेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना घराबाहेर निघण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.

त्याचबरोबर, समन्वय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच सशुल्क पुरवठा करणे, सामाजिक विलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे, मशीद, मंदिर या ठिकाणी प्रार्थनेसाठी, तसेच नमाज पठण, इफ्तार यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकाची जबाबदारी तालुका आरेाग्य अधिकारी यांची राहील, असे सांगण्यात आले आहे.

तसेच, दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे नियोजन संबधित सहाय्यक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी 24 तास पोलीस बंदोबस्त हे लोणी बु. चे पोलीस निरीक्षक यांनी लावावा, असे आदेशात सांगण्यात आले आहे. उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास साथरोग अधिनियम 1897च्या भारतीय दंड संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.