साउथम्पटन : जोस बटलरची (११०) शतकीय खेळी आणि डेव्हिड विली आणि लियाम प्लंकेट यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
साउथम्पटन येथे झालेल्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांनी पहिल्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी केली.
रॉयने ९८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. बेयरस्टोने ४५ चेंडूत ५१ धावा केल्या. कर्णधार इयॉन मार्गेन आणि जोस बटलर यांनी दोघांनी डाव सांभाळला. दोघांनी मिळून चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागीदारी केली. मोर्गनने ४८ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. बटलरने ५५ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. इंग्लंडने ५० षटकात ३ बाद ३७३ धावा केल्या आहेत.
प्रत्त्युरात ३७४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फखर जमान यांने चांगली सुरुवात करुन दिली. जमान आणि इमान उल हक यांनी पहिल्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली. जमाने १०६ चेंडूत १३८ धावांची खेळी केली. अखेर ५० षटकात ७ बाद ३६१ धावाच करता आल्या. त्यामुळे पाकचा १२ धावांनी पराभव केला. इंग्लंडकडून डेव्हिड विली, लियाम प्लंकेट यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ख्रिस वोक्स, मोईन अली आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.