मुंबई - एकेकाळी भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदार स्वत:च्या खांद्यावर सांभाळणारा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण फॉर्मात नसल्याने संघाबाहेर आहे. गेल्या दोन वर्षांत त्याला आयपीएलमध्येही कोणत्याच संघाने घेण्यास रस दाखविला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी पठाणने सीपीएल म्हणजेच कॅरेबियन प्रीमियर लीगचा रस्ता धरला आहे.
इरफान पठाणने सीपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. सीपीएलनेदेखील इरफान पठाणला ड्राफ्ट लिस्टमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. सीपीएलसाठी २२ मे रोजी लंडन येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्याला या लीगमध्ये खेळण्यास संधी मिळाली तर सीपीएलमध्ये खेळणारा तो या वर्षातला पहिला भारतीय खेळाडू असेल.
इरफान पठाणने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१२ साली खेळला तर आयपीएलमधील अखेरचा सामना २०१७ साली खेळला आहे. त्यानंतर तो स्थानिक सामन्यांत खेळताना दिसून आला. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याची जम्मू काश्मीरच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.