ETV Bharat / briefs

विराट सेनेला धक्का ! आयपीएलमध्ये धडाडणार नाही 'स्टेनगन' - undefined

स्टेनच्या संघात परतण्याने बंगळुरूने २ सामनेही जिंकले आहे. त्याने २ सामन्यांत ४ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

डेल स्टेन
author img

By

Published : Apr 25, 2019, 5:17 PM IST

बंगळुरू - सततच्या पराभवानंतर विजयी मार्गावर परतणाऱ्या विराटसेनेसाठी वाईट बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाल्याने आयपीएलमधून बाहेर पडला आहे. नाथन कुल्टर-नाइल याच्या जागी त्याला संधी देण्यात आली होती. आयपीएलमधील ८ पैकी ७ सामने हरल्यानंतर बंगळुरूने स्टेनला संघात घेतले होते.

स्टेनच्या संघात परतण्याने बंगळुरूने २ सामनेही जिंकले आहे. त्याने २ सामन्यांत ४ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ३५ वर्षीय स्टेन २०१६ पासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर जवळ जवळ २ वर्ष तो संघाबाहेर होता. २०१८ आणि २०१९ साली आयपीएलमध्ये त्याला कोणताच खरेदीदार मिळाला नाही.

इंग्लंडमध्ये ३० मे ते १ ४ जुलै दरम्यान आयसीसी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाच्या संघात स्टेनला संधी दिली आहे. आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकता आला नाही. या वर्षी आफ्रिकेला विश्वविजेता करण्यासाठी डेल स्टेनचे संघात असणे महत्वाचे आहे. विश्वचषकात खेळण्यासाठी स्टेनने कोणताही धोका न पत्करता आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.

डेल स्टेनचे बंगळुरूच्या संघात नसणे संघासाठी मोठा झटका आहे. यापूर्वी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे बंगळुरूचा संघ दुबळा वाटत आहे.

Intro:Body:

Sports NEWS 03

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.