ETV Bharat / briefs

'त्या' शाही स्वागत समारंभामुळे 100 कोरोनाबाधित, त्रिसदस्यीय समितीकडूूून होणार चौकशी - स्वागत समारंभ कोरोना प्रसार गंगाखेड

सर्वसामान्य व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी घ्यायची असेल तर त्याच्या हातात नियमांची यादी टेकवली जाते. शिवाय नियमांचा भंग झाल्यास कठोर कारवाईचा दम भरण्यात येतो. गंगाखेडचा हा शाही कार्यक्रम मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून साजरा झाला.

Collector office parbhani
Collector office parbhani
author img

By

Published : Jul 20, 2020, 5:14 PM IST

परभणी- 'लॉकडाऊन' च्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांचे लहान-मोठे कार्यक्रम प्रशासनाकडून रोखल्या जात आहेत. मात्र, याच परिस्थितीत गंगाखेड येथील एका मोठ्या उद्योजकाने सर्व नियम धाब्यावर बसवून शाही विवाह स्वागत सोहोळा पार पडला. या सोहोळ्यामुळे जवळपास 100 जण कोरोनाबाधित झाले आहेत. विशेष म्हणजे, या सोहोळ्यात जिल्ह्यातील राजकीय पुढारी, अधिकारी आणि अनेक व्यापारी उपस्थित होते.

या संदर्भात स्थानिक तहसीलदारांनी नोटिस बजावून देखील पुढे काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आता या सोहोळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. गंगाखेड येथे जिनिंग उद्योजक राधेश्याम भंडारी यांच्या कुटुंबाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा गुप्ता या तिघांची समिती नेमली आहे. ही समिती या स्वागत समारंभासाठी भंडारी कुटुंबाने परवानगी घेतली होती काय? तसेच या स्वागत समारंभासाठी नेमके किती लोक उपस्थित होते, याबाबत तात्काळ अहवाल सादर करणार आहे.

भंडारी यांच्या चिरंजिवाचा 25 जून रोजी लातूर येथे विवाह समारंभ पार पडला होता. त्यानंतर 28 जून रोजी गंगाखेड येथे त्यांनी शाही स्वागत सोहोळा आयोजित केला होता. जो आता जिल्हावासियांच्या मुळावर आला आहे. सर्वसामान्य व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी घ्यायची असेल तर त्याच्या हातात नियमांची यादी टेकवली जाते. शिवाय नियमांचा भंग झाल्यास कठोर कारवाईचा दम भरण्यात येतो. गंगाखेडचा हा शाही कार्यक्रम मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून साजरा झाला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आमदार, खासदार, महसूल, पोलीस आदी विभागातील अधिकारी, उद्योजक, व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्तींची हजेरी होती. त्यांना चांदीच्या ताटात जेवण दिले. त्यातील काहींना जाताजाता कोरोनाचा प्रसादही मिळाला, असेच म्हणावे लागेल.

महत्त्वाचे म्हणजे, सुरुवातीलाच भंडारी यांच्या घरातील वृद्ध महिला 5 जुलै रोजी कोरोनाबाधित आढळून आली होती. त्यानंतर या कार्यक्रमाला हजेरी लावलेले जवळपास 100 जण आतापर्यंत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गंगाखेड तालुक्यात रॅपिड टेस्ट करण्यासाठी खास अँटिजेन कीट मागविल्या. त्याद्वारे 400 हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच गंगाखेड शहरातील दोन व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे क्वारंटाईन व गंगाखेड शहरातील अन्य नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. तसेच नातेवाईक मानिसकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत.

या सर्व परिस्थितीला संबंधित व्यापारी आणि या व्यापाऱ्यास असा जाहीर कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध न करता साथ देणारे अधिकारी, राजकीय नेते जबाबदार आहेत. हजारो लोकांना संकटाच्या खाईत लोटणाऱ्या या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा प्रशासनाने स्वत:हून उगारावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी माध्यमांनी ही बाब उचलून धरली. ज्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानुसार या कार्यक्रमामुळे कोरोनाबाधित झालेल्या प्रति व्यक्तीच्या खर्चापोटी 5 हजार, तर क्वारंटाईन केलेल्या प्रति व्यक्तीच्या खर्चापोटी 2 हजार रुपये असा एकूण 5 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना तशी नोटिस बजावली आहे. त्यात 7 दिवसात 5 लाख रुपयांची रक्कम भरावी, असे आदेश देखील दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात ही नोटिस संबंधितांना तामील झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाईचे फक्त ढोंग रचल्या गेले, असेच म्हणावे लागेल. तसेच प्रशासनाची ही दिखाऊ कारवाई देखील उघडी पडली. ज्यामुळे आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारी यांच्या स्वागत समारंभाच्या चौकशीच्या निमित्ताने समिती गठीत केली आहे. आता ही समिती काय अहवाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.