ETV Bharat / briefs

इगोर स्टिमाक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड - Igor Stimac Appointed Indian Men Football Team New Coach

भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून स्टिमाक यांच्या कामाला थांयलंड येथे होणाऱ्या किंग्ज कप आंतरराष्ट्रीय मालिकेपासून सुरुवात होईल.

इगोर स्टिमाक
author img

By

Published : May 15, 2019, 2:59 PM IST

मुंबई - क्रोएशिया संघाचे सदस्य आणि माजी व्यवस्थापक इगोर स्टिमाक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. एआयएफएफच्या तांत्रिक समितीने प्रशिक्षक पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. स्टिमाक हे, क्रोएशियाई संघाचे सदस्य होते. त्यांचे नाव तांत्रिक समितीने निवडले आहे. ५१ वर्षांचे स्टिमाक हे दोन वर्ष भारतीय संघाला प्रशिक्षण देणार आहेत.

स्टिमाक यांनी राष्ट्रीय संघासोबतच अनेक क्लब संघांना मार्गदर्शन केले आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली हाजूक स्प्लिटने २००४-०५ मध्ये क्रोएशियन फुटबॉल लीग जिंकली होती.

स्टिमाक यांचा जन्म युगोस्लावियातील मेटकोविच या छोट्या शहरात झाला. त्यांनी क्रोएशयाकडून ५३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच क्लब फुटबॉलचे ३२२ सामने खेळले आहेत. स्टिमाक २०१२ ते २०१३ पर्यंत क्रोएशिया संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.