शिलॉंग - ईशान्य भारतामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या शंभरपेक्षा जास्त निमलष्करी जवान आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी मंगळवारी रात्री ट्वीटद्वारे मेघालय राज्यातील जवानांची कोरोना परिस्थिती सांगितली. राज्यामध्ये एकूण 318 कोरोनाचे रुग्ण असून त्यातील 186 रुग्ण हे सीमा सुरक्षा दलातील जवान आहेत. मेघालयचे आरोग्यमंत्री ए. एल. हेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय हवाई दलातील कर्मचाऱ्यांना आणि दोन केंद्रीय निमलष्करी जवानांना कोरोनाची लागण झाली होती.
मिझोराम -
मिझोराम राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आपतकालीन दलातील 26, आसाम रायफलमधील 21 तर सीमा सुरक्षा दलातील 19 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच एनडीआरएफ पथकातील जवान हे आसाम, मणिपूर, हरियाणा आणि आंध्रप्रदेश येथून मिझोराम येथे आले होते. राज्यामध्ये 238 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 159 रुग्ण हे बरे झाले आहेत.
नागालँंड आणि त्रिपुरा -
भारतीय लष्करातील अनेक जवान हे नागलँंड राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच त्रिपुरा राज्यामध्ये 200 सीमा सुरक्षा दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरनाची लागण झाली होती. मात्र, यातील बरेचशे कोरोनामुक्त झाले आहेत.