मुंबई - पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आला आहे. सध्या पाकिस्तानचा संघ आणि केंट यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सराव सामन्यात पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अलीचा खोटारडेपणा समोर आला आहे.
अॅलेक्स ब्लेक नावाच्या फलंदाजाचा झेल घेण्यासाठी हसन अली पुढे सरसावला. मात्र अलीच्या हातातून हा चेंडू निसटला. त्यानंतर अलीने विकेट घेतल्याच्या थाटात सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. पंचानीही फलंदाज बाद झाल्याचा निर्णय दिला. पंचानी बाद दिल्यावर ब्लेक माघारीत परतत होता. या प्रकाराविरुद्ध नॉन-स्ट्राईक एंडवर उभ्या असलेल्या ओ.जी.रॉबिन्सनने पंचांजवळ आपली नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तानने केंटविरुद्धचा सामना १०० धावांनी जिंकला असला तरी पंच आणि हसनच्या या कृत्यावर सर्व स्तरातून टीक होत आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ५० षटकात ७ बाद ३५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात केंटचा संघ २५८ धावांवरच तंबूत परतला. या सामन्यात अॅलेक्स ब्लॅक ८९ धावांवर बाद झाला. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध एक टी-२० सामना आणि ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे.