ETV Bharat / briefs

चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी तेलंगाणा राज्याची मदत घ्या; मुनगंटीवार यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

author img

By

Published : Apr 12, 2021, 9:53 PM IST

Sudhir mungantivar
Sudhir mungantivar

चंद्रपूर : जिल्‍हयातील वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या व वाढता मृत्‍युदर लक्षात घेता ज्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. त्‍यावर मात करण्‍यासाठी शेजारच्‍या तेलंगाणा राज्‍यातील आसिफाबाद, करिमनगर आणि आदिलाबाद या ठिकाणचे हॉस्‍पीटल्‍स चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी तेलंगणा सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्‍णांची संख्‍या वेगाने वाढत आहे. या ठिकाणी साऱ्या व्यवस्था कोलमडुन गेल्‍या आहेत. इंजेक्‍शन्‍स मिळत नसुन आवश्‍यक इंजेक्‍शन्‍सची टंचाई निर्माण झाली आहे. बेडस् उपलब्‍ध नाहीत. रुग्णांना दवाखान्‍याबाहेर २४–२४ तास उभे राहावे लागत आहे. खासगी दवाखान्‍यांमध्‍ये सुध्‍दा बेडस् उपलब्‍ध नाहीत. एकूणच चिंताजनक अवस्‍था निर्माण झाली आहे. मृत्यूदर वाढत चालला असूूून जिल्‍हा प्रशासन व आरोग्‍य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

शेजारच्‍या तेलंगाणा राज्‍यात चंद्रपूरहून 65 किमीवर आसिफाबाद, 110 किमी अंतरावर आदिलाबाद व 150 किमी अंतरावर करिमनगर ही जिल्‍हा मुख्‍यालय आहेत. याठिकाणी रूग्‍णसंख्‍या अतिशय कमी आहे. येेथील हॉस्‍पिटलमध्‍ये मोठ्या प्रमाणावर बेडस् उपलब्‍ध आहेत. डॉक्‍टर्स व आरोग्‍य कर्मचारी उपलब्‍ध आहेत. ऑक्‍सीजनची पाईपलाईन उपलब्‍ध आहे. रेमडेसिवीर इंजेक्‍श्‍न वगळता अन्‍य सर्व आरोग्‍य सुविधा या ठिकाणी उपलब्‍ध आहेत. याठिकाणचे हॉस्‍पिटल्‍स चंद्रपूर जिल्ह्यातील रूग्‍णांसाठी उपलब्‍ध झाल्‍यास कोरोना आटोक्‍यात येण्‍यास मोठी मदत होईल. यासंदर्भात तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव यांच्याशी मी चर्चा केली आहे. महाराष्‍ट्र सरकारकडून याबाबत प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यास सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याबाबत त्‍यांनी आश्‍वस्‍त केले आहे. तिन महिन्यांपूर्वी 36 रूग्‍णवाहीका चंद्रपूर जिल्ह्यासाठी विकत घेतल्‍या आहेत. त्‍यामाध्‍यमातून किंवा वातानुकुलीत बसेसच्‍या माध्‍यमातून रूग्‍णांना त्‍याठिकाणी पाठविता येवू शकेल. यादृष्टीने नियमातील तरतुदी तपासून तेलंगाणा सरकारशी सामंजस्‍य करार करावा व या राज्‍यातील करिमनगर, आसिफाबाद व आदिलाबाद येथील हॉस्‍पीटल चंद्रपूर जिल्‍हयासाठी उपलब्‍ध करावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍याकडे केली आहे. याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.