ETV Bharat / briefs

पालघरमध्ये बनावट दारूची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टोळीचा पर्दाफाश - बनावट दारू

पालघरमध्ये उच्च प्रतीच्या दारूच्या बाटल्यांमध्ये हलक्या दर्जाचे मद्य भरून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. वसई तालुक्यातील वाळिव येथे राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागाने हि कारवाई केली.

Fake liquor stores seized at Waliv
वसईतील वाळिव येथे बनावट दारूचा साठा जप्त
author img

By

Published : Dec 28, 2019, 2:51 PM IST

पालघर - हलक्या प्रतीचे मद्य विदेशी बाटल्यांमध्ये भरून त्याची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. वसई तालुक्यातील वाळीव येथे ही टोळी कार्यरत होती. विभागाने या ठिकाणी छापा टाकून जवळपास 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वसईतील वाळीव येथे बनावट दारूचा साठा जप्त

हेही वाचा... कराडमध्ये राडा... दारूचे पैसे देण्यावरून वेटर आणि हॉटेल मालकास जबर मारहाण; 8 जणांवर गुन्हा दाखल

वसईतील वाळिव येथे कमीत कमी चार ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या दारुची अवैधरित्या विक्री होत आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर विभागाने ही कारवाई केली. हलक्या प्रतीचे मद्य तयार करून किंवा विकत घेऊन त्यांना विदेशी लेबल असलेल्या बाटल्यांमध्ये भरले जात असे. त्यानंतर त्याची विक्री करण्याचे काम ही टोळी करत होती. वसई तालुक्यातील वाळीव येथे अधिकाऱ्यांनी छापा टाकून, हलक्या प्रतीचे मद्य तसेच विदेशी रिकाम्या बाटल्या मोठा साठा जप्त केली. जवळपास 7 ते 8 लाख रुपये किंमतीचा हा मुद्देमाल असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा... साकीनाका परिसरात लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू; 35 दुकानेही जळाली

पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या इतर टोळ्या अथवा विक्रेत्यांचा देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. लग्न समारंभ तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपींनी शासनाची परवानगी असलेल्या दुकानातूनच मद्य खरेदी करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा... गोरेगावातील 'नेस्को'मध्ये होणार मनसेचं 'महाअधिवेशन'

Intro:हलक्या प्रतीच्या महाराष्ट्रातील मद्य उच्च प्रतीच्या बाटली भरून विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला पर्दाफाश 
Body:

      हलक्या प्रतीच्या महाराष्ट्रातील मद्य उच्च प्रतीच्या बाटली भरून विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला पर्दाफाश 

नमित पाटील,  
पालघर, दि. 27/12/2019

       हलक्या प्रतीच्या महाराष्ट्रातील मद्य उच्च प्रतीच्या बाटली भरून विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. वसई तालुक्यातील वालीव येथे सदर टोळी महाराष्ट्रातील ब्लेंडर्स, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज हे 600 रुपयांपर्यंत मिळणार मद्य विदेशी रेड लेबल, ब्लॅक लेबल अशा उच्च प्रतीच्या लेबल असलेल्या बाटल्यांमध्ये भरून तब्बल चार ते पंचवीस हजारपर्यंत अवैधरित्या विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.  त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वसई तालुक्यातील वालीव येथे धाड टाकत महाराष्ट्रातील हलक्या प्रतीचे मद्य तसेच विदेशी रिकाम्या बाटल्या असा जवळपास 7 ते 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले असून यामागे पालघर, ठाणे जिल्ह्यात मोठी टोळी सक्रीय असल्याचा संशय ही व्यक्त करण्यात येत असून राज्य उत्पादन शुल्क सध्या याचा अधिक तपास करत आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपींना शासन परवानगी असलेल्या दुकानातूनच मध्ये खरेदी करावे असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे. 

Byte:-
 सुभाष जाधव - निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.