नवी दिल्ली - इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि टीम मॅनेजमेंटने चांगल्या कामगिरीनंतरही स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुसऱ्या वनडेतून बाहेर काढण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आर्चरने पदार्पण केले. हा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला. पण या सामन्यात त्याने गोलंदाजीत छाप सोडली होती.
लंडन येथील केनिंग्टन ओवलमध्ये झालेल्या सामन्यात पावासामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात त्याने ४ षटकांची गोलंदाजी करत २ षटके निर्धाव टाकले. याचसोबत त्याने फखर जमान याला माघारी धाडले. तरीही त्याला शनिवारी झालेल्या सामन्यात जोफ्रा आर्चरला संधी दिली नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळेल, अशी आशा होती. पण पहिल्या सामन्यानंतर त्याला बाहेर बसविण्यात आले. या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली असती तर त्याला विश्वकरंडकात खेळायला संधी मिळाली असती असे बोलण्यात आले असते पण आता जोफ्राच्या विश्वकरंडकात खेळण्याच्या आशा धुसर झाल्यासारखे वाटत आहे. त्याला विश्वकरंडकात खेळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.