ETV Bharat / briefs

निवडणूक भरारी पथकाकडून तीन ठिकाणांहून ७५ लाखांची रोकड जप्त

आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी सुरू

निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त
author img

By

Published : Apr 19, 2019, 2:21 PM IST

मुंबई - निवडणुकीत प्रचारासाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणाऱ्या पैशांवर निवडणूक आयोग व मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येते. मुंबई शहरात गुरुवारी तीन वेगवेगळया ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ७५ लाख रुपयांची संशयित रक्कम पकडली आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

cash seized
निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त

गुरुवारी (१८ एप्रिल) मुंबईतील गोल देऊळ एस.व्ही.पी रोड, या परिसरातून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील स्थिर तपासणी पथकाने एमएच.४ ईएच. ३२१२ या कारची तपासणी केली असता गाडीमध्ये प्रदिप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तीन जण आढळून आले असता या तिघांच्या ताब्यातून १० लाख रुपये रक्कम आढळून आली.

दुसरीकडे मुंबईतील भायखळा परिसरात तांबीट नाका, बी.जे. रोड येथे संकेत पेखळे यांच्या स्थिर तपासणी पथकाने सायंकाळी ओला गाडी क्र. एमएच.४३ बीजी. २८४३ या गाडीची तपासणी केली असता, गाडीत एकुण ४९ लाख ९८ हजार ५०० रुपये रक्कम आढळून आली.

निवडणूक आयोग भरारी पथकाचे अनिल रामचंद्र मोहिते यांच्या स्थिर तपासणी पथकाने ई.एम. पाटणवाला मार्ग, राणी बागजवळ, भायखळा येथे ईको स्पोर्ट्स फोर्ड एमएच १२ क्यूवाय. ३९६४ या वाहनाची तपासणी केली असता, त्यात १५ लाख रुपये आढळून आले. या तिन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले असून आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.

Intro:निवडणुकीत प्रचारासाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणाऱ्या पैशांवर निवडणूक आयोग व मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत असून मुंबई शहरात गुरुवारी तीन वेगवेगळया ठिकाणाहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाव्दारे 75 लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडली. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Body:गुरुवार 18 एप्रिल रोजी मुंबईतील गोल देऊळ एस.व्ही.पी. रोड, या परिसरातुन मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील स्थिर तपासणी पथकाने हुन्दई 120 या मोटार कारची (एम.एच.4 ई.एच.3212) तपासणी केली असता गाडीमध्ये प्रदिप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तीन इसम आढळून आले असता या तिघांच्या ताब्यातून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला 10 लाख रुपये रक्कम आढळून आली. तर दुसरीकडे मुंबईतील भायखळा परिसरात तांबीट नाका, बी.जे. रोड येथे संकेत पेखळे यांच्या स्थिर तपासणी पथकाने सायंकाळी ओला ॲसेन्ट गाडी क्र. एम.एच.43 बी.जी. 2843 या गाडीची तपासणी केली असता, गाडीत एकुण 49 लाख 98 हजार 500 रुपये रक्कम आढळुन आली. Conclusion:निवडणूक आयोग भरारी पथकाचे अनिल रामचंद्र मोहिते यांच्या स्थिर तपासणी पथकाने ई.एम. पाटणवाला मार्ग, राणी बाग जवळ, भायखळा येथे ईको स्पोर्ट्स फोर्ड एम.एच 12 क्यू.वाय. 3964 या वाहनाची तपासणी केली असता, त्यात 15 लाख रुपये आढळुन आले. या तिनही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.