ETV Bharat / briefs

दुरांताे, विदर्भ एक्स्प्रेस शुक्रवारपासून धावणार; आरक्षण सुरू

देशभरात टप्याटप्याने विशेष प्रवासी एक्सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. शुक्रवारपासून मुंबई-गाेंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर -मुंबई दुरांताे एक्स्प्रेस या गाड्या सुरू हाेत आहे. तर शनिवारपासून अप गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस व मुंबई – नागपूर दुरांताे एक्सप्रेस या गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाला गुरुवारपासुन सुरुवात झाली आहे.

train
रेल्वे
author img

By

Published : Oct 8, 2020, 9:46 PM IST

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वेची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. या दरम्यान काही मोजक्याच गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. अनलाॅक पाच अंतर्गत आता नागपूर-मुंबई दुरांताे एक्स्प्रेस व मुंबई-गाेंदिया विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा शुक्रवारपासून सुरु होणार आहे. यामुळे नवरात्राेत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुविधा मिळणार असुन या गाड्यांचे आरक्षण आज (गुरुवार) पासून सुरू झाले.

लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली रेल्वेगाड्यांची सेवा १ जूनपासून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. देशभरात टप्या टप्याने विशेष प्रवासी एक्सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. त्यात आता पुन्हा अप आणि डाऊन मार्गावरील चार गाड्यांची भर पडणार आहे. शुक्रवारपासून मुंबई-गाेंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर -मुंबई दुरांताे एक्स्प्रेस या गाड्या सुरू हाेत आहे. तर शनिवारपासून अप गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस व मुंबई – नागपूर दुरंताे एक्सप्रेस या गाड्या धावणार आहेत. दुरंतो एक्स्प्रेस भुसावळला थांबणार असून, विदर्भ एक्स्प्रेसचे थांबे पूर्वीप्रमाणेच आहेत. या विशेष गाड्यांमध्ये कनफर्म आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, नवरात्राेत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्या सुरु झाल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना मास्क सॅनिटायझर देऊन रेल्वे प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.