पुणे - देशभरात बहुतांश ठिकाणी धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात झाल्याचे मानले जाते धन्वंतरीपूजन देखील या दिवशी केलें जाते. चांगल्या मार्गाने, चांगल्या हेतूने कमावलेली संपत्ती आपल्या घरात टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. तसेच अनेक ठिकाणी धनत्रयोदशीला लक्ष्मी देवीचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे.
धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीचे पूजन का करतात -
धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. या दिवशी जागतिक आयुर्वे्द दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी असूर आणि देव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते आणि त्याच्यातून अमृत कलश घेऊन धनवंतरी देव प्रकट झाले होते. या धनवंतरी देवाच्या हातात एका हातात कमळ एका हातात अमृतकलश एका हातात जळू आणि दुसऱ्या हातात पोथी असे त्याचे स्वरूप आहे. धनवंतरी देवाची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते. जवळपास पाच हजार वर्षापासून धनवंतरी देवाची आयुर्वेदात पूजा केली जाते. आयुर्वेद आणि योग हे भारतीय परंपरेला मिळालेली अमूल्य अशी देणगी आहे.
येथे केली जाते धन्वंतरीची पूजा -
धन्वंतरी हे श्रीविष्णूंचे अंशावतार मानले जातात. धन्वंतरींचे मंदिर गुजरातमध्ये एकमेव असल्याचे सांगितले जाते. तामिळनाडूमधील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात धन्वंतरींचे मंदिर असून, तेथे धन्वंतरीची नित्य पूजा होते. उत्तर भारतात मात्र केवळ भगवान धन्वंतरीचे मंदिर आढळत नाही. भगवान धन्वंतरी केवळ महाराष्ट्र भारतापुरते मर्यादित नसून, जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या गुणांनी प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या विविध रूपांचे, चित्रांचे अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटनमध्ये पूजन होताना दिसते. आजच्या काळातही सर्वत्र सर्व वैद्य, चिकित्सक चिकित्सा बल, शक्ती वाढविण्यासाठी धन्वंतरीकडे प्रार्थना करताना दिसतात. पुण्यातील आयुर्वेद रसशाळा येथे धन्वंतरीची मूर्ती आहे या वेळी धनत्रयोदशीच्या दिवशी येथे धन्वंतरीची पूजा करण्यात आली.
हेही वाचा - विशेष : दिवाळीत गोड, तेलकट फराळ जीवावर बेतू शकतो; फराळ नियंत्रणात करा - आरोग्यतज्ञांचा सल्ला
हेही वाचा - Diwali 2021 : दिवाळी साजरी करण्यामागे काय आहेत पौराणिक कथा? जाणून घ्या....