ETV Bharat / briefs

ऑनलाईन शिक्षण वर्ग त्वरित बंद करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी

कोरोनाच्या संकट काळात शाळा कधी सुरू होतील हे अजूनही स्पष्ट नाहीये. राज्य सरकार त्याबाबत पूर्वतायरीला लागले असताना अनेक शिक्षण संस्था व शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. हे ऑनलाईन शिक्षण वर्ग त्वरित बंद करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

ऑनलाईन शिक्षण वर्ग त्वरित बंद करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश

author img

By

Published : Jun 16, 2020, 3:49 PM IST

नागपूर - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईल की नाही, असा प्रश्न सर्व पालकांना पडलेला असताना गेल्या काही दिवसांमध्ये खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलेले आहे. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक ताण आलेला आहे. ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून शिकवणीला सुरुवात करताच खासगी शाळांनी शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादादेखील लावायला सुरुवात केली आहे. या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रारींचा ओघ वाढला आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी एक आदेश काढला आहे, ज्यामध्ये ऑनलाईन शाळा सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या संकट काळात शाळा कधी सुरू होतील हे अजूनही स्पष्ट नाहीये. राज्य सरकार त्याबाबत पूर्वतायरीला लागले असताना अनेक शिक्षण संस्था व शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. हे ऑनलाईन शिक्षण वर्ग त्वरित बंद करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षाही घेण्यात आल्या नसून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मात्र, आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण वर्ग सुरू केले आहेत. काही शाळांनी तर नर्सरी पासूनचे ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.

ऑनलाईन शिक्षण हे सर्वसमावेशक नाही शिवाय ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाही. असे असताना खाजगी शाळांनी फी वसुलीसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले व पालकांना वेठीस धरीत असल्याचा आरोप पालकांनी केला. विदर्भातील शाळा तशाही 26 जून नंतरच सुरू होत असताना शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा अट्टाहास केला. सरकारचे ऑनलाईन व प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे कुठलेही निर्देश नसताना शाळांनी असे वर्ग त्वरित बंद करावे असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढले आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी आजपासून त्यांचे ऑनलाईन वर्ग बंद केल्याचीही माहिती आहे. शिक्षण विभागाच्या पुढील आदेशपर्यंत शाळांनी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष वर्गाविषयी निर्णय घेऊ नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जुलै महिन्यात शाळा सुरू होतील असे संकेत मिळायला लागले आहेत. त्यासंदर्भात काल मुंबईतील झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागातील शाळा उघडण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोनाविषयी पालकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठीसुद्धा विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.