हैदराबाद - इंडियन प्रीमीयर लीगमध्ये बुधवारी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघात महेंद्र सिंह धोनी खेळला नाही. त्याच्या जागेवर सुरेश रैना संघाचे नेतृत्व करत होता. सामन्यापूर्वी महेंद्र सिंह धोनी अंबाती रायुडूसोबत मैदानावर फेरफटका मारताना दिसून आला. धोनी सामन्यात खेळणार नसल्याचे समजताच फॅन्समध्ये घोर निराशा पसरली.
या आधी ९ वर्षापूर्वी म्हणजे २०१० च्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे बाहेर बसला होता. तेव्हाही संघाचे नेतृत्व सुरेश रैना करत होता. धोनी त्यावेळी ३ सामन्यांसाठी बाहेर बसला होता.
दरम्यान, मागील काही सामन्यात धोनीने पाठीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याची दुखापत गंभीर नसली तरी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून धोनीला आराम देण्यात आला आहे.
धोनी बाहेर असलेल्या सामन्यात चेन्नईची कामगिरी
- विरुद्ध संघ निकाल
- दिल्ली चेन्नईचा ५ गडी राखून विजय
- पंजाब चेन्नईचा सुपर ओव्हरमध्ये पराभव
- बंगळुरू चेन्नईचा ३६ धावांनी विजय