ठाणे - मुंबई आणि परिसरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात बदलापूर शहरात 17 तर अंबरनाथ शहरात 33 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. याबाबतची माहिती दोन्ही नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बदलापूर शहरात रविवारी 17 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता 309 वर जावून पोहचली आहे. तर आजच्या एका दिवसात 8 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रूग्णालयातून बरे होवून घरी पाठविण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 160 झाली आहे. सध्याच्या स्थितीत शहरात एकूण 140 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अंबरनाथ शहरातही रविवारी नव्याने 33 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण रूग्णांची संख्या 356 वर जाऊन पोहचली आहे. आजच्या दिवसात 8 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्णालयातून बरे होवून घरी पाठविलेल्यांची संख्या 133 झाली आहे. तर सध्याच्या स्थितीत अंबरनाथ शहरात एकूण 216 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.