चेन्नई - किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल फिट झाला असल्याची माहिती मयंक अगरवाल यांने पत्रकार परिषदेत दिली. गेल पाठीच्या दुखण्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळला नव्हता.
गेलच्या न खेळण्याने संघाचे नुकसान झाले नाही. त्याच्या जागी सॅम करेनला खेळविण्यात आले होते. सॅम अष्टपैलू कामगिरी करत हॅटट्रीक सह २० धावांची ताबडतोब खेळी केली. त्याच्या या खेळीने गेलची उणीव संघाला जास्त भासली नाही. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर किताबाने गौरविण्यात आले.
२८ वर्षीय अगरवाल अश्विन बाबत बोलताना म्हणाला की, अश्विन अनेक योजना बनवत असतो. कोणत्याही फलंदाजाला गोलंदाजी कशी करायची याचे अचूक नियोजन त्याच्याकडे असते. संघातील प्रत्येक खेळाडूची तो मदत करत असतो. खेळाडूंवर तो जबाबदारी टाकत असतो. त्याचा फायदा संघाला होतो.