चंद्रपूर- अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाईत पोलिसांनी एक वाहन व दारूसाठा जप्त केला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून इतर आरोपी हेमंत केशव केलझरकर यास अटक करण्यात आली आहे.
अवैध दारू तस्कर कृष्णा नारनवर (रा.चिमूर) हा हेमंत केशव केलझरकर याला देशी व मोहदारू विक्री करणार असल्याची गुप्ती माहिती चिमूर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर, कुष्णा व हेमंत यांच्यामध्ये अवैध दारूविक्री होत असताना पोलिसांनी धाड टाकली. मात्र यादरम्यान कृष्णा नारनवर फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी फोर्ड फियस्ता गाडी क्र. (एमएच 02 एवाय 9424) व अवैध दारू असा एकूण 3 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल तथा आरोपी हेमंत केळझरकर याला ताब्यात घेतले आहे.
फरार आरोपी कृष्णा नारनवर याचा पोलीस शोध घेत आहेत. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे, ना.पो.शी किशोर बोढे, पो.शी सचिन खामनकर, सचिन गजभिये यांनी पार पाडली.