ETV Bharat / briefs

दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कळसकरची कबुली, सीबीआयकडून न्यायालयात अहवाल सादर - sharad kalaskar

गेल्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्याकीय चाचणीत सीबीआयला सांगितले.

दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कळसकरची कबुली
author img

By

Published : Jun 26, 2019, 1:09 PM IST

Updated : Jun 26, 2019, 1:19 PM IST

पुणे - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान कळसकर याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी आणि सचिन अंदुरेनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती त्याने सीबीआयला दिली आहे. सीबीआयने याबाबतचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला आहे.

कळसकर म्हणाला, गेल्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्याकीय चाचणीत सीबीआयला सांगितले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली होती.

फाईल फूटेज

फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.

Intro:(फाईल फोटो वापरावे)
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्याकीय चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान कळसकर याने मी आणि सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती सीबीआयला दिली. सीबीआयने याबाबतचा अहवाल विशेष न्यायालयात सादर केला. Body:त्कळसकरची न्यायवैद्याकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत मी आणि सचिन अंदुरे याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने दिली आहे. तसेच गेल्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्याकीय चाचणीत सीबीआयला सांगितले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली.Conclusion:फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपापत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.
Last Updated : Jun 26, 2019, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.