ETV Bharat / briefs

भाजपचा राजस्थानमध्ये 'मध्यप्रदेश नाट्या'चा प्रयत्न - मुख्यमंत्री गेहलोत - राजस्थान काँग्रेस न्यूज

गेहलोत यांनी नरेंद्र मोदी सरकारवर राज्यसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मोदी सरकारने निवडणूक आयोगाला यासाठी दबाव आणल्याचे ते म्हणाले. राजस्थान आणि गुजरातमध्ये आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी त्यांनी असे केल्याचा आरोप गेहलोत त्यांनी केला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत
मुख्यमंत्री अशोक गेहलोत
author img

By

Published : Jun 11, 2020, 11:02 AM IST

जयपूर - मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी उशिरा भाजप राजस्थानात घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला. सरकार अस्थिर करण्यासाठी येथे भाजप मध्यप्रदेशात खेळलेला खेळ राजस्थानातही खेळत आहे, असे ते म्हणाले.

‘आमच्या आमदारांना 25 कोटींची ऑफर देण्यात आली. यापैकी 10 कोटी सुरुवातीला आणि उरलेले 15 कोटी काम झाल्यानंतर दिले जातील, असे या आमदारांना सांगण्यात आले. मात्र, या आमदारांनी लगेच आम्हाला कळवले. सध्या दिल्लीहून जयपूरला मोठ्या प्रमाणात पैसे आणले जात असल्याची माहिती आम्हाला अन्वेषण संस्थांकडून मिळाली आहे,’ असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी सांगितले. याची माहिती त्यांनी शिव-विलास रिसॉर्टबाहेर आल्यानंतर दिली. येथे काँग्रेस आणि अपक्ष मिळून एकूण 90 आमदार काल संध्याकाळपासून ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला आमदारांना पैशाच्या जाळ्यात अडकवले जाण्याच्या भीतीने या रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरा त्यांना घरी पाठवण्यात आले. यादरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत यांच्यासोबत बैठक करण्यात आली.

भाजपचा राजस्थानमध्ये 'मध्यप्रदेश नाट्या'चा प्रयत्न - मुख्यमंत्री गेहलोत

काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार के. सी. वेणुगोपाल जयपूरला येणार असल्याने गुरुवारी पुन्हा पक्षाचे कार्यकर्ते आणि अपक्षांची बैठक घेतली जाईल, अशी माहिती गेहलोत त्यांनी दिली. तसेच, आमच्या राज्याचे आमदार विकले गेले नाहीत, याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे असे ते म्हणाले.

गेहलोत यांनी नरेंद्र मोदी सरकारवर राज्यसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मोदी सरकारने निवडणूक आयोगाला यासाठी दबाव आणल्याचे ते म्हणाले. राजस्थान आणि गुजरातमध्ये आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी त्यांनी असे केल्याचा आरोप गेहलोत त्यांनी केला.

याआधी राजस्थानातील राजकीय घडामोडी शिगेला पोहोचले होत्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना चर्चेसाठी पाचारण केले आणि नंतर या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले.

दरम्यान, काँग्रेस प्रदोप महेश जोशी यांनी पोलीस महासंचालक आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. यामध्ये भाजप कार्यकर्ते काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले होते. तसेच, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.