ETV Bharat / briefs

अॅपलचीही मनोरजंन क्षेत्रात उडी, नेटफ्लिक्ससारखी ऑनलाईन व्हिडिओची स्ट्रिमिंग सुरू करणार - अॅपल

अॅपलने १०० कोटी डॉलरची स्ट्रीमिंग सेवेतील कार्यक्रमांसाठी गुंतवणूक केली आहे. यानंतर अॅपल ही अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हूलबरोबर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणार आहे.

संपादित
author img

By

Published : Mar 25, 2019, 2:24 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - अॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमांनी अनेकांना भुरळ घातली आहे. या क्षेत्रात अॅपलही लवकरच उडी घेणार आहे. अॅपल ही ऑनलाईन व्हिडिओची स्ट्रिमिंग सुरू करणार आहे. तसेच मासिक शुल्कावर गेमिंगची सेवाही देणार आहे.

अॅपलने १०० कोटी डॉलरची स्ट्रीमिंग सेवेतील कार्यक्रमांसाठी गुंतवणूक केली आहे. यानंतर अॅपल ही अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हूलबरोबर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणार आहे. एकंदरीत प्रसारण वाहिन्यांच्या तोडीस कार्यक्रम देऊन केबल टीव्हीसारखी अॅपल होईल, असे एका अमेरिकेतील माध्यमात म्हटले आहे.

काय असेल अॅपलचे आकर्षण-

हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या अमेझिंग स्टोरीसारखा कार्यक्रम अॅपल तयार करणार आहे. अमेरिकेच्या माध्यमातील वृत्तानुसार 'शांताराम' या कादंबरीवर एक मालिका अॅपल करत आहे. ही कादंबरी डेव्हिड रॉबर्ट यांनी लिहिली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकातील तुरुंगातून पळून आलेला एक जण मुंबईत येऊन स्थायिक झाला, त्याची कथा मालिकेत असणार आहे. तसेच 'सिक्थ सेन्स' या हॉलिवूड सिनेमाचे लेखक एम.नाईट श्यामलन यांचीही मालिका असणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. एकदंरीत अॅपलच्या मनोरजंन क्षेत्रातील प्रवेशाने प्रेक्षकांना आणखी चांगल्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.

Intro:Body:

Apple set to launch Netflix-style streaming service

अॅपलचीही मनोरजंन क्षेत्रात उडी, नेटफ्लिक्ससारखी ऑनलाईन व्हिडिओची स्ट्रिमिंग सुरू करणार

सॅन फ्रान्सिस्को - अॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमांनी अनेकांना भुरळ घातली आहे. या क्षेत्रात अॅपलही लवकरच उडी घेणार आहे. अॅपल ही ऑनलाईन व्हिडिओची स्ट्रिमिंग सुरू करणार आहे. तसेच मासिक शुल्कावर गेमिंगची सेवाही देणार आहे. 

अॅपलने १०० कोटी डॉलरची स्ट्रीमिंग सेवेतील कार्यक्रमांसाठी गुंतवणूक केली आहे. यानंतर अॅपल ही अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हूलबरोबर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणार आहे. एकंदरीत प्रसारण वाहिन्यांच्या तोडीस कार्यक्रम देऊन केबल टीव्हीसारखी अॅपल होईल, असे एका अमेरिकेतील माध्यमात म्हटले आहे. 

काय असेल अॅपलचे आकर्षण-

हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या अमेझिंग स्टोरीसारखा कार्यक्रम  अॅपल तयार करणार आहे. अमेरिकेच्या माध्यमातील वृत्तानुसार 'शांताराम' या कादंबरीवर एक मालिका अॅपल करत आहे.  ही कादंबरी डेव्हिड रॉबर्ट यांनी लिहिली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकातील तुरुंगातून पळून आलेला एक जण मुंबईत येऊन स्थायिक झाला, त्याची कथा मालिकेत असणार आहे. तसेच 'सिक्थ सेन्स' या हॉलिवूड सिनेमाचे लेखक एम.नाईट श्यामलन यांचीही मालिका असणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. एकदंरीत अॅपलच्या मनोरजंन क्षेत्रातील प्रवेशाने प्रेक्षकांना आणखी चांगल्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.