ETV Bharat / briefs

भाजपला मतदान करू नका, पुण्यात मनसेच्या महिला शहराध्यक्षांचा रिक्षातून प्रचार - bjp

नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपविरोधात अनोखा प्रचार सुरू केला आहे.

नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे
author img

By

Published : Apr 18, 2019, 3:34 PM IST

पुणे - देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप टीका करणे सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी देशभरात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपविरोधात अनोखा प्रचार सुरू केला आहे. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनासोबत घेऊन त्या स्वतः रिक्षा चालवत गर्दीच्या ठिकाणी पोहोचतात आणि भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करताना दिसतात.

मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांचा रिक्षातून प्रचार

राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नसली, तरी राज ठाकरेंनी भाजपविरोधात राज्यभरात रान उठवले आहे. त्यांच्या भाजपविरोधातील प्रचाराचे सोशल मीडियावर ज्याप्रमाणे कौतुक होते तशीच खिल्लीही उडवली जाते. त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षवेधी ठरत आहे. कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊन जरी ते प्रचार करत नसले तरी भाजपविरोधात मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात त्यांचा प्रचार सुरू आहे.

राज यांच्याप्रमाणेच त्यांचे कार्यकर्तेही जोमाने भाजपविरोधात प्रचाराला उतरले आहेत. पुण्याच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे या स्वतः रिक्षा चालवत प्रचार करत आहेत. शहरातील मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्या भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या प्रचाराबद्दल विचारले असता त्या सांगतात, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी आम्ही रिक्षाचा वापर करतो. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. येणाऱ्या पिढ्यांसह आम्हाला सुखाने जगायचे आहे, यासाठी आम्ही पुणेकरांना भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करतो.

Intro:देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही शिगेला पोहोचलाय. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप टीकाटिप्पणी सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी देशभरात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपविरोधात अनोखा प्रचार सुरू केलाय. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनासोबत घेऊन त्या स्वतः रिक्षा चालवत गर्दीच्या ठिकाणी पोहोचतात आणि भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करताना दिसतात. Body:राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नसला तरी राज ठाकरेंनी भाजपविरोधात राज्यभरात रान उठवले आहे. त्यांच्या भाजपविरोधातील प्रचाराचं सोशल मीडियावर ज्याप्रमाणे कौतुक होते तशीच खिल्लीही उडवली जाते. त्यांचा सभांना होणारी गर्दी लक्षवेधी ठरत आहे. कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊन जरी ते प्रचार करत नसले तरी भाजपविरोधात मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात त्यांचा प्रचार सुरू आहे. Conclusion:राज यांच्याप्रमाणेच त्यांचे कार्यकर्तेही जोमाने भाजपविरोधात प्रचाराला उतरले आहेत. पुण्याच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे या स्वतः रिक्षा चालवत प्रचार करत आहेत. शहरातील मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी ठिकाणी जाऊन त्या भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या प्रचाराबद्दल विचारले असता त्या सांगतात, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी आम्ही रिक्षाचा वापर करतो. 2014 च्या निवडणुकीत भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. येणाऱ्या पिढ्यासह आम्हाला सुखाने जगायचे आहे, यासाठी आम्ही पुणेकरांना भाजपला मतदान न करण्याचा आवाहन करतो.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.