अमरावती- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शक्षण मंडळाने यावर्षी मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यात अमरावती विभागाचा निकाल 95.15 टक्के लागला असून विभागात 96.10 टक्के निकाल असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली आहे.
अमरावती विभागात एकूण 1 लाख 67 हजार 455 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 56 हजार 341 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 59 हजार 35 इतकी आहे. द्वितीय श्रेणीत 38 हजार 979 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, तर उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थी संख्या 8 हजार 512 इतकी आहे.
विभागात प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक 16 हजार 87 ही संख्या बुलडाणा जिल्ह्याची आहे. अमरावती जिल्ह्यात प्रविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 11 हजार 876 आहे. अकोला जिल्ह्यात 8 हजार 938, यवतमाळ जिल्ह्यात 10 हजार 651 आणि वाशिम जिल्ह्यत 8 हजार 789 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत.
अमरावती विभागाचा निकाल
अमरावती : 93.94 टक्के
अकोला : 95.52 टक्के
बुलडाणा : 96.10 टक्के
यवतमाळ : 94.63 टक्के
वाशिम : 96.09 टक्के