मुंबई - मिर्झापूर नेटफ्लिक्सवरील वेब मालिकेत अली फजल आणि श्रीया पिळगांवकर हिने एकत्र काम केले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी आगामी ‘हाउस अरेस्ट’मध्ये एकत्र काम करणार आहे. श्रीयासोबत काम करताना स्वतःला कन्फर्टेबल वाटत असल्याचे फजलने म्हटले आहे.
‘हाउस अरेस्ट’चे दिग्दर्शन शशांक घोष आणि समित बासु यांनी केलंय. अलिकडेच दिल्लीत याचे शूटींग पार पडले. अली भोवती फिरणारा हा एक प्रासंगित कॉमेडी चित्रपट आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना फजल म्हणाला, " ‘हाउस अरेस्ट’ची स्क्रिप्ट खूप चांगली आहे. ही मजेदार आणि फ्रेश गोष्ट आहे. ही व्यक्तीरेखा करताना सेटवर खूप मजा आली. कॉमेडी असण्याबरोबरच यात छोटीशी गडबडही आहे. मला दर दिवशी सेटवर हजर रहावे लागत होते."
या चित्रपटात श्रीयासोबत काम करताना मजा आल्याचेही फजलने सांगितले.
अली फजल म्हणाला, " श्रीयासोबत काम करताना मी अगदी कन्फर्टेबल होत असतो आणि मला जास्त प्रयत्न करावा लागत नाही. या सिनेमाच्या मागे शशांक घोष आणि समित बासु यांचा हात आहे आणि दोघेही बुध्दीवान आहेत. त्यांना काय हव असतं हे मला नेमके समजते. चित्रपटाची जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र सृजनशील काम करण्यासाठी आम्हा कलाकारांना त्यांनी पूर्ण मुभा दिली होती."