ETV Bharat / briefs

अकोला जिल्हा परिषदेत कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी; कर्मचाऱ्यांची मागणी - जिल्हा परिषद कर्मचारी युनियन निवेदन

कोरोना आजाराचे गांर्भीय लक्षात घेता जिल्हा परिषद मुख्यालय व सर्व पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत संबधीतास योग्य ते निर्देश देण्यात यावेत, जेणे करून रोगाचा प्रादुर्भाव हा कार्यालयामध्ये होणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Jilha parishad employees
Jilha parishad employees
author img

By

Published : Jun 22, 2020, 8:34 PM IST

अकोला - नाशिक जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या वृत्तांनतर अकोला जिल्हा परिषदेमध्ये याची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता प्रशासना मार्फत तातडीने उपाययोजना करण्याकरिता आज जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालयांमध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच याबाबत संघटनेने पडताळणी केली असता जिल्हा परिषद मुख्यालयामधील विविध कार्यालयांमध्ये योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याचे दिसून आले.

बऱ्याच कार्यालयांमध्ये स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. तसेच कार्यालयांमधील प्रसाधन गृहांची अवस्था सुद्धा दयनीय झालेली आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याच प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची धास्ती बसलेली आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

कोरोना आजाराचे गांर्भीय लक्षात घेता जिल्हा परिषद मुख्यालय व सर्व पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत संबधीतास योग्य ते निर्देश देण्यात यावेत, जेणे करून रोगाचा प्रादुर्भाव हा कार्यालयांमध्ये होणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) सूरज गोहाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार, तसेच संघटनेच्या वतीने सुनिल जानोरकर, राज्य सरचिटणीस विलास वरोकार, जिल्हाध्यक्ष राम मेहरे, कार्याध्यक्ष गिरीश मोगरे, जिल्हा सचिव, राजेंद्र भटकर, नितीन सुदालकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.