ETV Bharat / briefs

पुण्यातील अखिल मंडईच्या गणपतीची मंदिरातच होणार प्रतिष्ठापना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Simple Ganesh utsav Akhil mandai pune

मंदिरातच सर्व धार्मिक विधी साजरे केले जाणार आहेत. यावेळी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आणि महाराष्ट्रातील भाविक येतात. यावेळी सॅनिटायझर, मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे, अण्णा थोरात यांनी सांगितले.

Akhil mandai press conference
Akhil mandai press conference
author img

By

Published : Jul 27, 2020, 4:49 PM IST

पुणे- पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात अखिल मंडई मंडळाच्यावतीने दरवर्षी दिमाखदार गणेश उत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. गेल्या 127 वर्षात प्रथमच यावर्षी मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना मंदिरात होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी अखिल मंडई मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे 125 वे वर्ष देखील विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले होते. परंतु पुण्यात कोरोनामुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला मुरड घालून मंडळातर्फे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे.

गणेशोत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलविण्यात येणार नाही. मंदिरातच सर्व धार्मिक विधी साजरे केले जाणार आहेत. यावेळी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आणि महाराष्ट्रातील भाविक येतात. यावेळी सॅनिटायझर, मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे, अण्णा थोरात यांनी सांगितले.

तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा निर्णय घेतला असून अखिल मंडई मंडळाच्या अनेक चांगल्या उपक्रमांचे अनुकरण पुण्यातील इतर मंडळे करतात. त्यामुळे यंदाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी मंदिरातच उत्सव साजरा करावा, असे आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.