ETV Bharat / briefs

केवळ 'राईड जॉय'साठी स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक; शाळकरी मुलांचाही समावेश - panvel robbery news

स्कुटी चालवण्याची मजा घेता यावी म्हणून स्कुटी चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील चार मुलांसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

panvel police
पनवेल पोलीस
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:06 PM IST

Updated : Dec 8, 2019, 11:58 AM IST

रायगड - स्कुटी चालवण्याची मजा घेता यावी म्हणून स्कुटी चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील चार मुलांसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही मुलं स्कुटी चालवून त्यातले पेट्रोल संपले, की ज्या ठिकाणी पेट्रोल संपले त्याच ठिकाणी लावून ठेवायचे आणि पुन्हा नवीन स्कुटी चोरी करायचे. एखाद्या चित्रपटाचे कथानक वाटावं, असा हा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे.

पनवेलमध्ये स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक;

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

काय आहे प्रकरण-

पनवेल आणि परिसरात गेल्या काही दिवसात स्कुटी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. स्कुटी चोरी ही साधारणपणे पैशासाठीच होत असल्याने चोरटे चोरीच्या स्कुटी विकतात आणि पुन्हा नवीन चोरतात, असा पोलिसांचा आजवरचा अनुभव होता. पण, पनवेल परिसरात मागील काही दिवसात झालेल्या स्कुटी चोरांनी तर चक्क पोलिसांनाच चिंतेत टाकले होते. कारण, या चोरी झालेल्या स्कुटी पेट्रोल संपलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडत होत्या. आतापर्यंत एकूण 5 स्कुटी या बेवारस स्थितीत आढळून आल्या होत्या.

crime
केवळ 'राईड जॉय'साठी स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक

या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर पोलिसांना आणि पालकवर्गाला चिंतेत टाकणारे एक धक्कादायक वास्तव समोर आले. कारण, ही स्कुटी चोरणारी टोळी म्हणजे प्रत्यक्षात पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणारी लहान मुलं आहेत. फक्त बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून ते या स्कुटी चोरी करत होते.

पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद

खारघर, पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून स्कुटी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत तपास केल्यानंतर कुठेही चोरी झालेल्या स्कुटी विकल्याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोण करतंय? याचा तपास करणे पनवेल पोलिसांसाठी आव्हान बनले होते. अखेर गस्त वाढवल्यावर आणि स्कुटी चोरीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यावर पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आला.

crime
स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक

हेही वाचा - चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन आमदारांच्या मध्यस्थीने मागे

पनवेल परिसरात राहणारी अवघी 10 ते 15 वर्षांची मुलं स्कुटी चोरी करायचे. उद्देश एकच, बाईक चालवण्याची मजा घेता यावी. या लहान मुलांची उंची कमी असल्याने अॅक्टिव्हा, स्कुटी अशा बाईकला ते प्राधान्य द्यायचे. एका 'मास्टर की'च्या साहाय्याने स्कुटीचे हॅन्डल ओपन झाले, की प्लगच्या वायर्स जोडून ते या स्कुटी सुरू करायचे आणि पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद घ्यायचे.

स्कुटीमधले पेट्रोल संपले, की ती स्कुटी व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवत, पुन्हा नवीन स्कुटी शोधायचे. केवळ राईडसाठी अशाप्रकारे या मुलांनी तब्बल तीन लाख 20 हजार रुपयांच्या 12 स्कुटी चोरल्या होत्या. याबाबत पोलिसांनी तपास करून 7 स्कुटी हस्तगत केल्या असून इतर 5 स्कुटी या आधीच बेवारस स्थितीत सापडल्या होत्या आणि सोबतच या बाईक चोरणाऱ्या या चार लहान मुलांना अटक केली. तर, आणखी दोन आरोपी पनवेल पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सुशील सुनील म्हस्के (वय-45, रा. कोपरागाव, सेक्टर 10, खारघर) आणि संतोष राजकुमार कांबळे ( वय-18, रा. मालधक्का शेड, पनवेल) अशी अटक केलेल्या इतर दोन आरोपींची नावे आहेत. यातील संतोष कांबळे हा भंगार वेचण्याचे काम करत होता. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात 10, सानपाडा पोलीस ठाण्यात 1 आणि खारघर पोलीस ठाण्यात 1 गुन्हे दाखल आहेत.

स्कुटीच्या डिक्कीतुन ड्युप्लिकेट चावीच्या मदतीने चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. विकास मोहन धोत्रे (37) असे या आरोपीचे नाव असून पनवेलमधल्या आकुर्ली येथून ट्रॅप लावून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 61 हजार रुपयांची स्कुटी आणि चार ड्युप्लिकेट चाव्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

स्कुटी चालवून मजा करण्यासाठी स्कुटी चोरी करणारी सगळी मुलं अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली असून पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ही मुलं आपल्या मोहापायी आज अडचणीत सापडले आहेत.

Intro:सोबत व्हिज्युअल जोडले आहेत.

पनवेल

स्कुटी चालवण्याची मजा घेता यावी म्हणून स्कुटी चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील चार बालक आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही मुलं स्कुटी चालवून त्यातलं पेट्रोल संपलं, की ज्या ठिकाणी पेट्रोल संपलं त्याच ठिकाणी लावून ठेवायचे आणि पुन्हा नवीन स्कुटी चोरी करायचे. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं, असा हा प्रकार पनवेलमध्ये घडलाय.
Body:काय आहे प्रकरण?

पनवेल आणि परिसरात गेल्या काही दिवसात स्कुटी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. स्कुटी चोरी ही साधारणपणे पैशासाठीच होत असल्याने चोरटे चोरीच्या स्कुटी विकतात आणि पुन्हा नवीन सावज शोधतात, असा पोलिसांचा आजवरचा अनुभव. पण पनवेल परिसरात मागील काही दिवसात झालेल्या स्कुटी चोऱ्यांनी तर चक्क पोलिसांनाच चिंतेत टाकलं होतं. कारण या चोरी झालेल्या स्कुटी पेट्रोल संपलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडत होत्या. आतापर्यंत एकूण 5 स्कुटी या बेवारस स्थितीत आढळून आल्या होत्या.

या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर पोलिसांना आणि समस्त पालकवर्गाला चिंतेत टाकणारं एक धक्कादायक वास्तव समोर आलं. कारण, ही स्कुटी चोरणारी टोळी म्हणजे प्रत्यक्षात पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणारी लहान मुलं होती. फक्त बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून ते या स्कुटी चोरी करत होते.

पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद

खारघर, पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून स्कुटी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत तपास केल्यानंतर कुठेही चोरी झालेल्या स्कुटी विकल्या गेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोण करतंय? याचा तपास करणं पनवेल पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं. अखेर गस्त वाढवल्यावर आणि स्कुटी चोरीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यावर पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आला.

पनवेल परिसरात राहणारी अवघी 10 ते 15 वर्षांची मुलं स्कुटी चोरी करायचे. उद्देश एकच, बाईक चालवण्याची मजा घेता यावी. या लहान मुलांची उंची कमी असल्याने अॅक्टिव्हा, स्कुटी अशा बाईक्सना ते प्राधान्य द्यायचे. एका 'मास्टर की'च्या साहाय्याने स्कुटीचं हॅन्डल ओपन झालं, की प्लगच्या वायर्स जोडून ते या स्कुटी सुरू करायचे आणि पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद घ्यायचे.

बाईकमधलं पेट्रोल संपलं, की ती बाईक व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवत पुन्हा नवीन स्कुटी शोधायचे. केवळ जॉय राईडसाठी अशाप्रकारे या मुलांनी तब्बल 3 लाख 20 हजार रुपयांच्या 12 स्कुटी चोरल्या होत्या. याबाबत पोलिसांनी तपास करून 7 स्कुटी हस्तगत केल्या असून इतर 5 स्कुटी या आधीच बेवारस स्थितीत सापडल्या होत्या आणि सोबतच या बाईक चोरणाऱ्या या चार लहान मुलांना अटक केली. तर आणखी दोन आरोपी पनवेल पोलिसांच्या ताब्यात आहेत. सुशील सुनील म्हस्के (वय-45, रा. कोपरा गाव, सेक्टर 10, खारघर) आणि संतोष राजकुमार कांबळे ( वय-18, रा. मालधक्का शेड, पनवेल) अशी अटक केलेल्या इतर दोन आरोपींची नावं आहेत. यातील संतोष कांबळे हा भंगार वेचण्याचे काम करत होता. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात 10, सानपाडा पोलीस ठाण्यात 1 आणि खारघर पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल झालाय. Conclusion:तसंच स्कुटीच्या डिक्कीतुन ड्युप्लिकेट चवीच्या मदतीने चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आलीय. विकास मोहन धोत्रे (37) असं या आरोपीचं नाव असून पनवेलमधल्या आकुर्ली इथून ट्रॅप लावून अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून 61 हजार रुपयांची स्कुटी आणि चार ड्युप्लिकेट चाव्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

राईड जॉय साठी स्कुटी चोरी करणारी सगळी मुलं अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली असून पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ही मुलं आपल्या मोहापायी आज अडचणीत सापडले आहेत.
Last Updated : Dec 8, 2019, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.