राजुरा (चंद्रपूर)- तेलंगणा राज्याचा सिमेवरील असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. तालुक्यातील करंजी गावातील 20 वर्षीय युवक कोरोनाबाधित निघाला. काल (3 जून) रात्री या युवकाचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यातून युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
युवक मजुरीसाठी तेलंगणात गेला होता. दोन दिवसापूर्वी गावात परतल्यानंतर प्रशासनाने युवकाला गृह अलगीकरणात ठेवले होते. काल रात्री हा युवक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल तालुका प्रशासनाला प्राप्त झाला होता. युवकाला उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. करंजी गावाच्या सिमा सिल करण्यात आल्या आहे. आता पर्यंत ग्रिन झोन असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने तालुका प्रशासन सतर्क झाले आहे तर कोरोना रुग्ण सापडल्याने करंजीसह गोंडपिंपरी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.