ETV Bharat / briefs

स्पेशल स्टोरी : 25 दिवस कोरोनाशी लढून 83 वर्षीय आजीची कोरोनावर मात

श्रीवर्धन शहरातील 83 वर्षीय महिलेवर महाड येथील रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र, 25 दिवस त्यांनी कोरोनाशी मुकाबला करून त्याला हरवले आहे. आज त्या कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

आजीने केली कोरोनावर मात
आजीने केली कोरोनावर मात
author img

By

Published : Jul 31, 2020, 6:20 PM IST

रायगड - स्वतःची इच्छा शक्ती दृढ असेल तर कोणत्याही रोगावर मात करता येऊ शकते. अशाच एका कोरोना झालेल्या 83 वर्षीय आजीची तब्येत अति बिघडली असतानाही 25 दिवसानंतर त्यांनी कोरोनावर मात केल्याची किमया केली आहे. या आजी श्रीवर्धन शहरातील रहिवासी असून आज जिल्हा रुग्णालयातून त्या सुखरूप घरी परत गेल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 25 दिवस आजीवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, सेविका यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

श्रीवर्धन शहरातील 83 वर्षीय महिलेवर महाड येथील रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी रुग्णालयात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना 5 जुलैरोजी अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोवृद्ध असल्याने त्ंयांच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नातेवाईकांनीही त्यांची आशा सोडू दिली असून डॉक्टरांनाही तुमच्या परीने प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र, या परिस्थितीतही जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ राजीव तांबाळे, डॉ. विक्रमजीत पाडोळे, डॉ. अपूर्वा पाटील यांनी आजीला कोरोनामुक्त करण्यासाठी 25 दिवस अहोरात्र जीवाचे रान केले. डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि आजीची जगण्याची तीव्र इच्छा यामुळे कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर त्यांनी मात केली. दरम्यान, त्यांचे पतींचे त्या उपचार घेत असताना दुर्धर आजाराने निधन झाले. मात्र ही माहिती त्याच्यापासून लपवून ठेवण्यात आलेली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज या आजींना घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी आजींना पुष्पगुच्छ, गुलाब देऊन त्यांना निरोप दिला. यावेळी डॉ. राजीव तांबाळे, डॉ अपूर्वा पाटील, मेट्रेन मोरे आरोग्य सेवक, सेविका यांनीही आजींना गुलाबपुष्प देऊन निरोप दिला. तर, 83 वर्षीय आजी कोरोनावर मात करून बऱ्या झाल्याने इतर कोरोनाबाधीत रुग्णांनीही घाबरून न जाता आजीचा आदर्श घेतला पाहिजे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.