जळगाव- जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. आज पुन्हा 75 अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पारोळा 37, जळगाव शहर 12, भुसावळ 9, रावेर 5, अमळनेर 4, एरंडोल 3, धरणगाव, यावल प्रत्येकी 2, जामनेरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 149 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाला शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 75 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढतच चालला आहे.
पारोळा शहरात कोरोनाचा अचानक उद्रेक
पारोळ्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल 37 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जवळपास पहिले 2 महिने पारोळा शहरासह तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, कोरोना शिरल्यानंतर आता याठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येने दीडशतकाचा टप्पा ओलांडला आहे.
दुसरीकडे, जळगाव शहरात तर परिस्थिती अजून गंभीर होत चालली आहे. जळगावात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आज देखील पुन्हा 12 रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकट्या जळगाव शहरातील रुग्णसंख्या आता 404 इतकी झाली आहे.
कोरोना अपडेट्स-
जळगाव शहर- 404
जळगाव ग्रामीण- 66
भुसावळ- 353
अमळनेर- 259
चोपडा- 166
पाचोरा- 49
भडगाव- 94
धरणगाव- 101
यावल- 107
एरंडोल- 73
जामनेर- 106
रावेर- 160
पारोळा- 154
चाळीसगाव- 19
मुक्ताईनगर- 15
बोदवड- 16
इतर जिल्हे- 7
एकूण- 2149