पालघर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 24 तासात 69 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, 72 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अढळलेल्या 69 कोरोना रुग्णांपैैकी 26 पालघर तालुक्यातील, 7 डहाणू तालुक्यातील, 17 जव्हार तालुक्यातील, 4 वाडा तालुक्यातील, 6 मोखाडा तालुक्यातील आणि 9 वसई ग्रामीण भागातील आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 414 इतकी झाली असून 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 833 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 563 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.