कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. काल रात्री 8 पासून आज सकाळी 10 पर्यंत आणखी 5 रुग्ण वाढले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
इचलकरंजी येथील एका वयोवृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेल्याने कोल्हापुरातील एकूण मृत्यूंची संख्या 11 वर पोहोचली आहे. दरम्यान, आजपर्यंत एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 839 वर पोहोचली आहे, तर त्यातील 716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक बी.सी. केम्पी पाटील यांनी दिली आहे. आजपर्यंत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सद्यस्थितीत 112 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 78
भूदरगड- 75
चंदगड- 90
गडहिंग्लज- 103
गगनबावडा- 7
हातकणंगले- 16
कागल- 57
करवीर- 25
पन्हाळा- 29
राधानगरी- 68
शाहूवाडी- 184
शिरोळ- 8
नगरपरिषद क्षेत्र- 39
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-47
एकूण 826, तसेच पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-4 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हे व राज्यातील 13 असे मिळून एकूण 839 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.