ETV Bharat / briefs

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन शिकाऱ्यांना अटक; बंदुकीसह काडतुसे जप्त - Suspected hunters arrest Sahyadri reserve

बिरू सखाराम माने, पांडुरंग लक्ष्मण माने व बाबूराव बिरू माने (सर्व रा. ताकवलीमुरा जि. सातारा) अशी संशयित्यांची नावे आहेत. सिंगल बोअर बंदूक व 2 जिवंत काडतुसांसह हे तिघेही बामणोलीजवळ देऊर या भागात शिरले होते.

Hunters arrest satara
Hunters arrest satara
author img

By

Published : Jul 13, 2020, 7:08 PM IST

सातारा- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात शिकारीच्या उद्देशाने शिरलेल्या 3 शिकऱ्यांना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक बंदूक व 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

बिरू सखाराम माने, पांडुरंग लक्ष्मण माने व बाबूराव बिरू माने (सर्व रा. ताकवलीमुरा जि. सातारा) अशी संशयित्यांची नावे आहेत. सिंगल बोअर बंदूक व 2 जिवंत काडतुसांसह हे तिघेही बामणोलीजवळ देऊर या भागात शिरले होते. हा भाग कोयना अभयारण्यात व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात मोडतो. संशयित आरोपींवर वन्यजीव अधिनियम 1972 कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी संशयित्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी संशयित आरोपींच्या घरांची झडतीही घेतली होती. 'रितू' या श्वानाच्या मदतीने घराची तपासणी करण्यात आली. तथापी तेथे काहीही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनिस, वनपाल एम. बी. शिंदे, सुरज इनकर, डी. एम. जानकर, ए.पी. माने, एस. बी. पाटील, सुमित चौगुले यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.