ETV Bharat / briefs

करकंब येथे आढळलेत 2 कोरोनाबाधित; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

author img

By

Published : Jul 7, 2020, 6:54 PM IST

दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तात्काळ माहिती गोळा करण्यात आली असून रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांना पंढरपूर येथील गजानन महाराज मठ व वाखरी एमआयटी कोविड केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Karkamb corona
Karkamb corona

सोलापूर- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे 2 नवे कोरोनाबाधित रुग्न आढळून आल्याने संबधित ठिकाणी प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी दिली.

दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तात्काळ माहिती गोळा करण्यात आली असून रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांना पंढरपूर येथील गजानन महाराज मठ व वाखरी एमआयटी कोविड केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबधित भागाचे तात्काळ निर्जतुकीकरणही करण्यात आले आहे. या भागातील होम टू होम सर्व्हे करण्यात येत असून, जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करून माहिती संकलित करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी घोडके यांनी दिल्या आहेत.

तसेच, प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरीय समितीने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्याबरोबरच बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, त्यांची माहिती प्रशासनास कळवावी. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहन गटविकास अधिकारी घोडके यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.