नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. नाशिक जिल्ह्यात आता पर्यँत 3 लाख 3 हजार 994 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2 लाख 52 हजार 112 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 48 हजार 571 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोनामुळे 3311 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 82.91 टक्के इतके आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोज 5 ते 6 हजाराच्या पटीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र, अशात कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणदेखील त्याच पटीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कोरोनाबाधित हे घरीच वेळेवर उपचार घेतल्यानं बरे होत आहेत.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 35 हजार 653 जणांचे कोरोना अहवाल तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 26 हजार 261 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 3 लाख 3 हजार 994 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 82.91 टक्के इतके आहे.