सांगली - कोरानामुळे सांगली जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यूू झाला आहे. आतापर्यंत 12 जणांचा बळी गेला आहे, तर आज दिवसभरात 13 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 5 जण हे सांगली महापालिका क्षेत्रातले रुग्ण आहेत, तर 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 107 झाली आहे. तर आता पर्यंत जिल्ह्यात 339 कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जिल्ह्यात आज कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यातल्या अंकले येथील 66 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. आज कोरोना लागण झालेल्यांमध्ये शिराळ्याच्या मणदूर येथील 2 ,कोकरूड येथील 1, आटपाडीच्या शेटफळे येथील 2 जण, गोमेवाडी येथील 1, मिरज तालुक्यातील बुधगाव मधील 1, पलूस तालुकयातील दुधोंडी येथील 1 आणि सांगली शहरातील सम्राट व्यायाम मंडळ शेजारील 1, उत्तर शिवाजी नगर येथील 3 आणि झुलेलाल चौक येथील 1 आशा 13 जणांचा समावेश आहे. सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींचा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला दिवसभरात 7 कोरोना रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मिरजेच्या कोणा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 2, शिराळा शहर 1 , आटपाडीच्या निंबवाडे येथील 1, मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील 1 आणि तासगाव तालुक्यातल्या वायफळे येथील 1 आशा 7 जणांचा समावेश आहे.
दिवसभरात वाढलेले रुग्ण आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 106 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 339 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 221 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.