अहमदनगर- जिल्ह्यात आज (शनिवार) तब्बल 126 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, आज 54 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 540 इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 930 इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जामखेड 2, नगर ग्रामीण 3, नगर शहर 79, नेवासा 2, पारनेर 3, राहाता 7, संगमनेर 17, शेवगाव 1, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
आज आढळलेल्या 54 बाधितांमध्ये नगर शहर 10 (मार्केट यार्ड 3, नालेगाव 1, केडगाव 1, भिस्तबाग चौक 1, सुडके मळा 1, रेल्वे स्टेशन 1, रंगार गल्ली 1, बागड पट्टी 1), श्रीरामपूर 4 (शहर 2, बेलापूर 1, शिरसगाव 1), कर्जत 2 (शहर 1, माही जळगाव 1) अकोले 4 (शहर 3, लहीत 1), जामखेड 2 (सोनेगाव 1, साकत 1), नगर ग्रामीण 3 (निंबलक 1, घोस्पुरी 1, निमगाव घाना 1), पाथर्डी 1, शेवगाव 10 (शहर 5, मुंगी 5), नेवासा 3 (सोनई), पारनेर 9 (लोणी मावळा 3, पिंपळगाव रोठा 2, कर्जुले हर्या 1, कुंभार वाडी 1, वडनेर बुद्रुक 1, खडक वाडी 1), संगमनेर येथील 6 (गुंजाळ वाडी 3, कुरण 3) रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी :
उपचार सुरू असलेले रुग्ण - 540
बरे झालेले रुग्ण - 930
मृत्यू - 35
एकूण रुग्ण संख्या - 1493