सांगली - सांगली जिल्ह्यात आज आणखी 10 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जत तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहेे. त्यामुळे जिल्ह्यातल्या अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 130 झाली आहे, तर आता पर्यंत जिल्ह्यात 368 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जत तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे. जत तालुक्यातील बिळूरमधील 6, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील 1, शिराळामधील 2 आणि सांगली शहरातील सम्राट व्यायाम मंडळ येथील 1 अशा 10 जणांचा समावेश आहे. सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींचा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर, आतापर्यंत एकूण 368 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 226 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.