ETV Bharat / briefs

भंडारा जिल्ह्यात 4 नवे कोरोनाबाधित; जिल्ह्यातील एका युवकाचा नागपुरात कोरोनाने मृत्यू

author img

By

Published : Jul 13, 2020, 9:51 PM IST

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 4 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 87 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 174 झाली असून 85 क्रियाशील रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 2 झाली आहे.

Bhandar covid update
Bhandar covid update

भंडारा- जिल्ह्यातील एका 33 वर्षीय युवकाचा आज नागपूर येथे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रकृती अधिक खालावल्याने या रुग्णाला नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर, जिल्ह्यातील 4 व्यक्तींचे अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 4 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 87 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 174 झाली असून 85 क्रियाशील रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 2 झाली आहे.

भंडारा तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेता असलेल्या 33 वर्षीय युवकाला ताप, खोकला व सर्दीसाठी 10 जुलै रोजी भंडारा येथील एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. तेथून त्याच दिवशी युवकाला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे संदर्भित करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला व आजच या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण कोरोना, न्यूमोनिया व तीव्र स्वासदाह असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार 440 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 174 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 4 हजार 950 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 316 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

तसेच, आज आयसोलेशन वॉर्डमध्ये 93 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 530 व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी येथे 485 जण भरती आहेत. 4 हजार 283 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याचबरोबर, पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44 हजार 926 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 42 हजार 784 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणांहून आलेल्या 2 हजार 142 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.