ETV Bharat / breaking-news

जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये 'या' एकमेव भारतीय खेळाडूचे नाव - Jonty Rhodes

जॉन्टी ऱ्होड्स
author img

By

Published : Feb 14, 2019, 7:57 PM IST

2019-02-14 19:30:13

जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये 'या' एकमेव भारतीय खेळाडूचे नाव

मुंबई - सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघात एकपेक्षा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत.  कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा हे सर्व सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या वर्गात मोडतात. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा सारख्या खेळाडूंचा क्षेत्ररक्षणात दबदबा होता.  जगातील सर्वोत्तम पाच क्षेत्ररक्षक असलेल्या खेळाडूंच्या यादीत केवळ एका भारतीयाची निवड करण्यात आली आहे.
जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा आणि फिल्डिंगचा बादशाह, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने या पाच खेळाडूंची निवड केली आहे.  त्यात भारतीय संघाच्या सुरेश रैनाची निवड केली आहे.  जाँटी याचा हा व्हिडिओ आयसीसीने शेयर केला आहे.

जॉन्टी ऱ्होड्सने निवडलेल्या पाच सर्वोत्तम क्षेत्ररक्षकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू सायमंड्सचे नाव आहे. यासोबत दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स आणि एबी डिविलियर्स तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड या यादीत सामील आहेत.

सुरेश रैनाच्या बाबतीत जाँटी बोलताना म्हणाला, की भारतीय मैदानात गवत कमी असते. येथे क्षेत्ररक्षण करताना बऱ्याच अडचणी येतात. तरीही रैना स्लिप आणि आउटफिल्डमध्ये उत्तम क्षेत्ररक्षण करतो. जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकात समावेश केल्याने सुरेश रैनाने जाँटीचे आभार मानले आहेत.

Intro:Body:

Vidarbha score 425 runs in 1st Innings at Irani Cup, Day 3

IRANI CUP : विदर्भाच्या पहिल्या डावात ४२५ धावा, ९५ धावांची आघाडी  

नागपूर - इराणी ट्रॉफीचा तिसऱ्या दिवशी विदर्भाचा डाव ४२५ धावा संपुष्टात आला.  विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने १०२ धावा करत  शानदार शतकी खेळी केली. तर संजय रघुनाथच्या ६५ आणि अक्षय वाडकरने केलेल्या ७३ धावांच्या अर्धशतकी खेळीने विदर्भाची  धावसंख्या ४०० पार पोहचली. तसचे विदर्भाला ९५ धावांची आघाडीही मिळाली. 

शेष भारताच्या राहूल चहरने सर्वाधिक ४ विकेट घेतलेत, तर  कृष्णप्पा गौतम, अंकित राजपूत आणि डी. जाडेजाने प्रत्येकी २ गडी गारद केले. 

या सामन्याच्या पहिल्या दिवशी शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिवसअखेर सर्वबाद ३३० धावा केल्या होत्या. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.