ETV Bharat / breaking-news

जवान संजयसिंह राजपूत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अखेरचा निरोप
author img

By

Published : Feb 16, 2019, 4:33 PM IST

Updated : Feb 16, 2019, 6:58 PM IST

2019-02-16 18:15:34

मुलाच्या हाताने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी

बुलडाणा - जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान संजयसिंह राजपूत यांना पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत. हवेत गोळीबार करून पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.

2019-02-16 16:24:27

संजयसिंह राजपूत यांचे पार्थिव मलकापुरात दाखल

बुलडाणा - जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान संजयसिंह राजपूत यांना पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांचे पार्थिव मलकापूरमध्ये दाखल झाले आहे. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

आज १२ वाजता त्यांचे पार्थिव औरंगाबादमधल्या चिखलठाणा विमानतळावर पोहचले. तेथे श्रद्धांजली आणि मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या मुळगावी पार्थिव रवाना करण्यात आले होते.दुपारी १२ वाजता सीआरपीएफतर्फे जवान संजयसिंह राजपूत (चोरपांगरा, गोवर्धन नगर, जि. बुलडाणा) आणि जवान नितीन राठोड (लोणार, जि. बुलडाणा) यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहण्यात आली. सीआरपीएफचे जवान मानवंदना देताना विमानतळावर शांतता पसरली होती. मात्र, त्यानंतर विमानतळ परिसरात नागरिकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यमंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संजय राजपूत यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने त्यांच्या मुळगावी पाठवण्यात आले आहे.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Feb 16, 2019, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.