ETV Bharat / city

भानुशाली इमारत दुर्घटना : 23 जणांची सुटका, 6 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट

portion of building collapses in near csmt mumbai
मुंबईमधील सीएसटी येथील भगतसिंग मार्गावरील इमारतीचा भाग कोसळला
author img

By

Published : Jul 16, 2020, 5:37 PM IST

Updated : Jul 17, 2020, 7:39 AM IST

07:35 July 17

भानुशाली इमारत दूर्घटनेत आणखी एक मृतदेह सापडला; मृतांचा आकडा ६ वर

भानुशाली इमारत दूर्घटनेत आणखी एक मृतदेह सापडला; मृतांचा आकडा ६ वर पोहोचला आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून अद्यापही बचाव कार्य सुरू असून कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

01:21 July 17

भानुशाली इमारत दुर्घटना : बचावकार्यात 23 जणांची सुटका, तर ५ जणांचा मृत्यू

मुंबई - भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून, 23 जणांची सुखरुप सुटका केली आहे. एनडीआरएफ कडून सध्या बचावकार्य सुरूच आहे.  

00:15 July 17

भानुशाली इमारत दुर्घटना : बचावकार्यात 18 जणांची सुटका, चार जणांचा मृत्यू

भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून आतापर्यंत एकूण चार जणांचा यात मृत्यू झाला आहे. घटनास्थळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे.  

21:24 July 16

भानुशाली इमारत दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात आतपर्यंत 18 जणांची सुटका तर चार जणांचा मृत्यू

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागात असलेल्या भानुशाली इमारतीचा काही भाग आज (गुरुवार) सायंकाळी कोसळला. त्या ठिकाणी जो ढिगारा झाला त्या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत 18 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण जखमी आहेत. अद्याप येथे बचावकार्य सुरु आहे.

20:07 July 16

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग घटनास्थळी दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुर्घटनास्थळी भेट...

मुंबई - फोर्ट भागातील जीपीओ पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली भानुशाली इमारतीची एक बाजू कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मात्र, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली उडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याव्यतिरिक्त, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

20:01 July 16

भानुशाली इमारत दुर्घटना: घटनास्थळी एनडीआरएफची टीम, खासदार अरविंद सावंतही दाखल

  • Mumbai: People from Bhanushali building at Fort being rescued by the fire department, after a portion of the building collapsed today. A team of NDRF moved to the spot. pic.twitter.com/8b2eqZNhhP

    — ANI (@ANI) July 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - भानुशाली इमारत दुर्घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू होते, अशी माहीती मिळत असून इतर कुटुंबीयांना देखील इतरत्र पाठवले जाईल, अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

19:51 July 16

भानुशाली इमारत दुर्घटना : 6 जणांची सुटका, दोघांचा मृत्यू

भानुशाली इमारत दुर्घटना : बचावकार्य सुरू..

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य वेगाने सुरु आहे. यात आतापर्यंत 6 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

19:34 July 16

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची घटनास्थळी भेट

मुंबई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली इमारत आज (गुरुवार) सायंकाळी कोसळली. ही इमारत अतिधोकादायक असल्याने ती नव्याने बांधण्यास पालिकेने परवानगी दिली होती. मात्र, मालकाने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. इमारतीच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या इमारतीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.

18:21 July 16

भानुशाली इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला, ईटीव्ही भारतचा ग्राऊंड रिपोर्ट

भानुशाली इमारत दुर्घटना.. ईटीव्ही भारतचा ग्राऊंड रिपोर्ट

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिस जवळील शहीद भगत सिंग मार्गावरची ही इमारत आहे. प्राप्त माहितीनुसार एका बाजूची इमारत कोसळल्यानंतरही बाजूला गॅलरींमध्ये काही नागरिक होते. सध्या या ठिकाणी इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला आहे.

18:14 July 16

भानुशाली इमारत दुर्घटना : शोधमोहीम सुरू, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई - मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ जीपीओसमोर असणाऱ्या भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सदर ठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत दोन जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

17:52 July 16

सीएसएमटीजवळील भानुशाली इमारतीचा अर्धा कोसळला; ढिगाऱ्यातून दोघांची सुखरुप सुटका

portion of building collapses in near csmt mumbai
सीएसएमटीजवळील भानुशाली इमारतीचा अर्धा कोसळला...

मुंबई सीएसएमटी येथील जीपीओ जवळील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग आज (गुरुवार) सायंकाळी पत्त्यासारखा कोसळला. या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 2 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल मलाबा हटवत असून त्यात कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

17:47 July 16

सीएसएमटीजवळील इमारतीचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पोस्ट ऑफिस समोर असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

17:24 July 16

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, क्रेनच्या सहाय्याने आतापर्यंत १२ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

मुंबई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील येथील भगतसिंग मार्गावरील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Last Updated : Jul 17, 2020, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.