श्रीनगर - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत.ल जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला झाला. या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढून ४५ वर पोहोचला आहे, तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे १२ सदस्य या घटनेचा तपास करण्यासाठी शुक्रवारी जम्मू-काश्मीर येथे जाणार आहेत. राजनाथ सिंह यांनी बडगम येथे जाऊन वीरमरण आलेल्या जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी त्यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाघ सिंह उपस्थित होते.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या उपस्थितीत श्रीनगरमध्ये बैठक सुरू.