नवी दिल्ली: टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022 ) मध्ये झिम्बाब्वेने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा एका रनने पराभव केला. झिम्बाब्वेच्या या ऐतिहासिक विजयानंतर पाक संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोलचा सामना करावा लागतो आहे. (pakistan trolled). या ट्रोलिंगच्या शर्यतीत आता झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्षही (zimbabwe president) सहभागी झाले आहेत. त्यांनी एका ट्विटद्वारे संपूर्ण पाकिस्तानचा उघडपणे अपमान केला आहे. (zimbabwe president trolled pakistan)
काय आहे ट्वीट: झिम्बाब्वेच्या विजयानंतर मिस्टर बीन सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. याचे कारण असे की, झिम्बाब्वेच्या एका कार्यक्रमात एका पाकिस्तानी कलाकाराने खोटा मिस्टर बीन बनून तेथील लोकांची फसवणूक केली होती. आता झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर त्यांच्या संघाचे अभिनंदन करताना अध्यक्ष इमर्सन मनंगाग्वा यांनी लिहिले, 'झिम्बाब्वेसाठी हा विजय फार मोठा आहे! शेवरॉनचे अभिनंदन. पुढच्या वेळी खरे मिस्टर बीन पाठवा.'
-
What a win for Zimbabwe! Congratulations to the Chevrons.
— President of Zimbabwe (@edmnangagwa) October 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Next time, send the real Mr Bean…#PakvsZim 🇿🇼
">What a win for Zimbabwe! Congratulations to the Chevrons.
— President of Zimbabwe (@edmnangagwa) October 27, 2022
Next time, send the real Mr Bean…#PakvsZim 🇿🇼What a win for Zimbabwe! Congratulations to the Chevrons.
— President of Zimbabwe (@edmnangagwa) October 27, 2022
Next time, send the real Mr Bean…#PakvsZim 🇿🇼
मीस्टर बीन प्रकरण काय? : लोकांना हसवण्यासाठी ब्रिटनच्या रोवन ऍटकिन्सनने मिस्टर बीनची भूमिका साकारली आहे. 2016 मध्ये हरारे येथे एका कार्यक्रमादरम्यान एका पाकिस्तानी कलाकाराने खोटा मिस्टर बीन बनून तेथील लोकांची फसवणूक केली होती. आसिफ मुहम्मद असे त्याचे नाव आहे. झिम्बाब्वेचे चाहते त्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या 'फसवणुकीचा' बदला घेण्यासाठी 2016 पासून वाट पाहत आहेत.
सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सराव सत्राची छायाचित्रे शेअर केली होती. या पोस्टवर झिम्बाब्वेच्या एनगुगी चुसरा या चाहत्याने कमेंट केली. त्यांनी लिहिले की, झिम्बाब्वेचा नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एकदा तुम्ही खऱ्या मिस्टर बीन ऐवजी बनावट पाकिस्तानी बीन दाखवले होते. उद्या मैदानावर या प्रकरणाची चौकशी करू. उद्या पाऊस तुम्हाला वाचवो अशी प्रार्थना करा.
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला 20 षटकांत आठ विकेट्स गमावून केवळ 129 धावा करता आल्या. झिम्बाब्वेच्या विजयाचा हिरो ठरला तो सिकंदर रझा आणि त्याने 25 धावांत तीन बळी घेतले. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. विश्वचषकात पाकिस्तानचा हा दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.