ETV Bharat / bharat

YS Sharmila Arrested : वायएसआरच्या अध्यक्षा शर्मिला यांना अटक, पदयात्रेवरून तणाव - शर्मिला

वायएसआरच्या अध्यक्षा वायएस शर्मिला यांच्या पदयात्रेवरून तणाव निर्माण झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सत्ताधारी बीआरएस आमदाराविरुद्ध अनुचित टिप्पणी केल्याप्रकरणी शर्मिलाविरुद्ध महबूबाबाद टाउनमध्ये एससी, एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

YS Sharmila Arrested
वायएसआरच्या अध्यक्षा शर्मिला यांना अटक
author img

By

Published : Feb 19, 2023, 12:57 PM IST

महबूबाबाद (तेलंगणा) : तेलंगणातील महबूबाबाद येथील बेथोले येथे पदयात्रेवरून विविध गटांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर वायएसआर अध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हैदराबादला हलविले आहे.

बीआरएस - वायएसआरच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी : सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या बीआरएस कार्यकर्त्यांनी शर्मिला यांच्या बेठोले येथील सभेच्या ठिकाणी गोंधळ घातला होता. बीआरएस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत वायएसआर तेलंगणा पार्टीचे कट-आउट आणि फ्लेक्स खाली पाडले. यानंतर बीआरएस आणि वायएसआरच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शर्मिला बसमध्ये असताना तिला पोलिसांद्वारे अटक करण्यात आली. पुढील संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी शर्मिलाला अटक करून पोलिस वाहनातून हैदराबादला नेले. पोलिसांनी पदयात्रेला परवानगी नाकारल्यानंतर शर्मिलाने सरकारवर टीका केली होती. अधिकार्‍यांनी परवानगी नाकारल्यामुळे हाणामारी झाल्याचे सांगितले आहे.

आमदार शंकर नाईक यांच्या विरोधात टिप्पणी : सत्ताधारी बीआरएस कार्यकर्त्यांनी आरोप केला की, शर्मिला यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार शंकर नाईक यांच्यावर अवास्तव टिप्पणी केली आहे. वायएसआरटीपीच्या बैठकीच्या ठिकाणी त्यांनी धरणे आंदोलन केले. महबूबाबादचे आमदार शंकर नाईक यांच्या विरोधात अनुचित टिप्पणी केल्याप्रकरणी वायएस शर्मिला यांच्या विरोधात महबुाबाद टाउन पोलिस ठाण्यात एससी, एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीआरएस मंडळाचे कार्याध्यक्ष लुणावत अशोक यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून शर्मिला यांनी महबूबाबादचे आमदार शंकर नाईक यांचा भ्रष्टाचार, बेकायदेशीर, जमीन बळकावणे आणि दरोड्यात सामील असल्याचे सांगत कठोर शब्दांत अपमान केला आहे. वायएसआरटीपीने शनिवारी संध्याकाळी महबूबाबाद येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत तिने कथितपणे हे वक्तव्य केले.

शर्मिला सध्या तेलंगणात सक्रिय : वाय एस शर्मिला यांनी तेलंगणातील चंद्रशेखर राव सरकारवर तिची प्रजा प्रतिष्ठान पदयात्रा सुरू केल्यापासून जोरदार हल्ला चढवला आहे. तिचा भाऊ आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर शर्मिला यांनी आपले लक्ष तेलंगणात घातले असून त्यांनी येथे स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला. वाय. एस. शर्मिला सध्या तेलंगणातच सक्रिय आहेत.

हेही वाचा : Chinese Citizen Arrested: व्हिसा नसताना चिनी नागरिकाने केली भारताची यात्रा.. नेपाळ बॉर्डरवरून परत जाताना झाली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.