ETV Bharat / bharat

Violence over Agneepath Scheme : तेलंगणात अग्निपथ योजनेच्या निषेधासाठी व्हॉट्सअपवर आखली होती योजना - 35 ट्रेन सेवा रद्द

अग्निवीर योजनेवरून ( Agneepath scheme ) देशभरात हिंसाचार उसळला आहे. सर्वत्र गाड्यांना लक्ष्य केले जात आहे. यूपी आणि बिहारनंतर आता हैदराबादमध्ये रेल्वेची जाळपोळ झाली. सशस्त्र दलातील भरतीशी संबंधित केंद्राच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात शुक्रवारी संपूर्ण दक्षिणेकडील राज्यात निदर्शने झाली.

telangana
telangana
author img

By

Published : Jun 17, 2022, 4:06 PM IST

Updated : Jun 17, 2022, 4:30 PM IST

हैदराबाद : अग्निवीर योजनेवरून देशभरात हिंसाचार ( Violence over Agniveer Scheme )उसळला आहे. विविध ठिकाणी रेल्वेगाड्यांना लक्ष्य केले जात आहे. यूपी आणि बिहारनंतर आता हैदराबादमध्ये रेल्वेची जाळपोळ झाली. सशस्त्र दलातील भरतीशी संबंधित केंद्राच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात शुक्रवारी संपूर्ण दक्षिणेकडील राज्यात निदर्शने ( Agnipath Scheme Protest ) झाली. येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर अज्ञात लोकांनी पॅसेंजर ट्रेनचा पार्सल डबा पेटवून दिला. दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, आंदोलकांनी लष्कराच्या नोकऱ्यांमध्ये सामान्य भरतीची मागणी करत केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी आधीच सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आधीच सिकंदराबादला पोहोचण्याचा संदेश प्रसारित केला होता. त्यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ( Messages through WhatsApp group ) आंदोलनाच्या कटाची माहिती शेअर केली. तेलंगणातील विविध जिल्ह्यातील तरुण गुरुवारी रात्री शहरात पोहोचले होते. सर्वप्रथम त्यांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकासमोर धरणे आंदोलन सुरू केले. जिथे काही आंदोलकांनी स्थानकाबाहेरील बसच्या खिडक्या फोडल्या.

रेल्वेचे जाळलेले डब्बे
रेल्वेचे जाळलेले डब्बे

त्यानंतर सकाळी नऊ वाजता युवक स्टेशनच्या आत धावत आले आणि रेल्वे रुळावर जाऊन बसले. काहींनी फलाटावरील स्टॉल, स्टेशनवर उभ्या असलेल्या गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. आणि त्यानंतर पॅसेंजर ट्रेनच्या पार्सल कोचला आग ( Arson at Secunderabad railway station ) लावली. त्यानंतर अतिरिक्त फौजा स्थानकात दाखल होताच जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. या क्रमाने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील अनेक स्टॉलचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अधिका-यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

हिंसाचारावर नियंत्रण मिळवताना
हिंसाचारावर नियंत्रण मिळवताना

हेही वाचा - Agnipath: अग्निपथ योजने'अंतर्गत लवकरच भरती प्रक्रिया; लष्करप्रमुखांची माहिती

Last Updated : Jun 17, 2022, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.