एसबीआय जनरल विमा कंपनी वादळामुळे झालेल्या नुकसानाचा जलदगतीने आढावा घेण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहे.
Cyclone Yaas : बंगाल-ओडिशामध्ये चार बळी; सुमारे २० लाख लोकांचे स्थलांतर.. - cyclon yaas update
22:06 May 26
एसबीआय जनरल विमा कंपनी ड्रोनच्या सहाय्याने घेणार नुकसानाचा आढावा..
22:03 May 26
बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू..
बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सायंकाळी सात वाजेपासून सुरू झाले होते. वादळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत हे विमानतळ बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, धोका टळल्यामुळे कामकाज सुरू करण्यात आले.
20:46 May 26
पुढील तीन तासांमध्ये यासची तीव्रता होणार कमी..
सध्या तीव्र चक्रीवादळ असलेल्या यासची तीव्रता पुढील तीन तासांमध्ये कमी होणार आहे. यानंतर हे केवळ चक्रीवादळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
20:46 May 26
बंगाल-ओडिशामध्ये चार बळी; सुमारे २० लाख लोकांचे स्थलांतर..
यास चक्रीवादळामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये आतापर्यंत प्रत्येकी दोन जणांचा बळी गेला आहे. तर, सुमारे २० लाख लोकांचे यामुळे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
19:21 May 26
केंद्रपाडा : यास चक्रवादळामुळे केंद्रपाडामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसह रस्ते आणि घरांनाही नुकसान पोहोचले आहे.
18:00 May 26
बंगालमध्ये यास चक्रीवादळाच्या दोन बळींची नोंद
पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळामुळे दोन जणांच्या बळींची नोंद झाली आहे. बांकुरामध्ये असलेल्या मदत केंद्रामध्ये एका महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर, मंडारमनी येथे चार मच्छिमार बुडाले होते, त्यांपैकी तिघांना एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले, तर एक बेपत्ता आहे. बाहेर काढलेल्यांपैकी एकाचा काही वेळानंतर मृत्यू झाला.
17:59 May 26
ममता बॅनर्जी वादळाचा तडाखा बसलेल्या भागाला देणार भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वादळाचा तडाखा बसलेल्या भागाला शुक्रवारी भेट देणार आहेत. नॉर्थ २४ परगणा, साऊथ २४ परगणा, पूर्व मिडनापोरे आणि पश्चिम मिडनापोरे या भागांना त्या भेट देतील. यासोबतच त्या सुंदरबनचीही पाहणी करणार आहेत.
17:15 May 26
'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे हावड़ा जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रदद्..
'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे हावड़ा जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रदद्. मध्य रेल्वे व दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णय..
रदद् होणाऱ्या गाड्या -
- 24 मे रोजी 02221 पुणे - हावड़ा विशेष गाड़ी
- 27 मे रोजी 02222 हावड़ा-पुणे विशेष गाड़ी
- 24 मे रोजी 02818 पुणे - सांतरागाछी विशेष गाड़ी
- 29 मे रोजी 02817 सांतरागाछी- पुणे विशेष गाड़ी
- 24 मे रोजी 02767 नांदेड़ - सांतरागाछी विशेष गाड़ी
- 26 मे रोजी 02768 सांतरागाछी - नांदेड़ विशेष गाड़ी
- 25 मे 26 में रोजी 02834 हावड़ा- अहमदाबाद विशेष गाड़ी
- 25 मे व 29 मे रोजी अहमदाबाद- हावड़ा विशेष गाड़ी
- 25 मे 26 मे रोजी 02810 हावड़ा- CSMT विशेष गाड़ी
- 24 मे 28 मे रोजी CSMT - हावड़ा विशेष गाड़ी
- 25 मे 26 मे 02280 हावड़ा- पुणे विशेष गाड़ी
- 24 मे 25 मे पुणे -हावड़ा विशेष गाड़ी पुणे - हावड़ा विशेष गाड़ी
- 25 मे रोजी 02906 रोजी हावड़ा-ओखा विशेष गाड़ी
- 30 मे रोजी ओखा - हावड़ा विशेष गाड़ी
- 26 मे रोजी 02260 हावड़ा- CSMT विशेष गाड़ी
- 25 मे रोजी CSMT- हावड़ा विशेष गाड़ी
15:21 May 26
वादळ गेले तरी उद्यापर्यंत समुद्रात जाऊ नका..
यास चक्रीवादळ हे समुद्रातून जमीनीवर गेले असले, तरी उद्यापर्यंत समुद्रात जाऊ नका असा इशारा हवामान खात्याने बंगाल आणि ओडिशामधील मच्छिमारांना दिला आहे. उद्या सकाळपर्यंत सर्व परिसरात पाऊस सुरूच राहणार असल्यामुळे, समुद्र शांत असणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून समुद्रात जाणे टाळा, असे भुवनेश्वर हवामान विभागातील संशोधक उमाशंकर दास यांनी म्हटले आहे.
15:19 May 26
चक्रीवादळाचा एक कोटी लोकांना फटका - ममता बॅनर्जी
यास चक्रीवादळामुळे सुमारे एक कोटी लोकांना फटका बसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच, सुमारे १५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचेही त्यांनी सांगितले.
14:50 May 26
यासचा ओडिशामध्ये लँडफॉल; पाहा पावसाची दृश्ये..
यास चक्रीवादळाने ओडिशामध्ये लँडफॉल केला आहे. हे चक्रीवादळ आता जमीनीवर आल्यामुळे काही तासांमध्ये त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
14:25 May 26
यास : मुंबई विमानतलावरील देखील सहा उड्डाणे रद्द
यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील सहा उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई ते भुवनेश्वरची तीन आणि मुंबईते कोलकाताच्या तीन विमानांचा समावेश आहे. दरम्यान, इतर ठिकाणची नियोजित उड्डाणे ठरल्याप्रमाणे होणार आहेत.
13:07 May 26
यास चक्रीवादळ उद्या सकाळपर्यंत झारखंडमध्ये पोहोचेल, त्यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास 60-70 किलोमीटर राहिल. अशी माहिती आयएमडीचे अधिकारी महापात्रा यांनी दिली
12:57 May 26
यास चक्रीवादळाची ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक
यास चक्रीवादळ ओडिशाच्या उत्तर किनारपट्टी भागात धडक दिली, सकाळी साडेदहा नंतर बालासोर पासून दक्षिणेला २० किमी पर्यंत पुढे सरकले. वाऱ्याचा वेग ताशी 155 किमी इतका आहे. हे वादळ उत्तरपूर्व दिशेने पुढे सरकत असून लँडफॉलची प्रकिया तीन तासात पूर्ण होईल असे आयएमडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
12:36 May 26
यास चक्रीवादळ किनारपट्टीच्या जवळ घोंगावत असून समुद्र खवळलेला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या सागरी किनारपट्टी भागातील जवळपास 11.5 लाख नागरिकांना स्थलातरीत करण्यात आले आहे. जवळपास 20,000 घरांचे नुकसावन झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
12:28 May 26
पश्चिम बंगालमधील शंकरपूर दिघामध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी नागरी वस्तीत
यास चक्रीवादळाच्या प्रभावाने पश्चिम बंगालमध्ये लांटाचे तांडव सुरू झाले आहे. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात समुद्राच्या लाटांचे पाणी गावात शिरत आहेत. तर अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर येऊन दक्षिण परगणामधील अनेक तलाव फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तर कपील मुनी मंदिर देखील पाण्यात गेले आहे.
11:21 May 26
किनारपट्टी भागातील गावात शिरले समुद्राचे पाणी
ओडिशा - यास चक्रीवादळ ओडिशा राज्याच्या किनारपट्टी भागात घोगांवू लागल्याने समुद्र खवळला आहे. परिणामी किनारपट्टी भागातील धमरा आणि भद्राक जिल्ह्यातल्या काही रहिवासी भागात समुद्राच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. यास वादळ पुढील २ तासात किनारपट्टीभागात धडकेल ताशी १४ किमी वेगाने हे वारे पुढे सरकत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
11:08 May 26
झारखंडमध्ये हाय अलर्ट
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये देखील हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. झारखंडमध्ये ताशी 110-120 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी देखील एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
बंगालच्या खाडीत तयार झालेल्या या चक्रीवादळाचा देशातील पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार बेटांना तडाखा बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ ने आपल्या 113 तुकड्या तैनात केल्या आहेत.
11:04 May 26
वादळाच्या परिस्थितीवर प्रशासनाचे २४ तास लक्ष-
बॅनर्जी म्हणाल्या की, यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील 4000 प्रभावित होऊ शकणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेऊन आहोत. या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या सचिवालयामध्ये देखील नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच जास्त प्रभावित होणाऱ्या जिल्ह्यामध्ये बचाव दलाच्या तुकड्या तैनात कऱण्यात आल्या आहेत.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशानास खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने जवळपास 5,000 गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. ज्या महिला जून महिन्यापर्यंत प्रसुती होऊ शकतात. तसेच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गृहराज्य मंत्री डी एस मिश्रा यांना राज्याच्या उत्तर भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी त्यांना बालासोर येथे पाठवण्यात आले आहे. किनारपट्टी भागातील केंद्रपाड़ा, जगतसिंहपूर, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्याला वादळाचा अधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे.
11:03 May 26
दोन लाख पोलीस तैनात-
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल ओडिशाच्या शेजारील राज्य झारखंडमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी नऊ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. तर दुसरीकडे ओडिशा सरकारने किनारपट्टी भागातील जिल्ह्यातून जवळपास तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलातरीत केले आहे,
भुवनेश्वरच्या विभागीय हवामान विज्ञान केंद्राचे अधिकारी डॉ. उमाशंकर दास यांनी यास चक्रीवादळ हे ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील धमरा आणि चांदबालीच्या मध्ये धडकणार असल्याची माहिती दिली.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिमबंगालमध्ये 74,000 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आणि दोन लाख पोलीसबळ तैनात केले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्याच्या तुकड्याही तैनात करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
10:21 May 26
यास वादळाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा प्रभावित, विमान उड्डाणे रद्द
बोस, बीजू पटनायक विमानतळ बंद
हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे वादळ ज्यावेळी किनारपट्टीवर धडकेल त्यावेळी वाऱ्याचा वेग सुमारे ताशी 155 ते 165 किलोमीटरवरून 185 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वादळाचा धोका लक्षात घेता भारतीय विमान प्राधिकरणाने कोलकात्याचे नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमान तळावर बुधवारी सकाळी 8:30 वाजल्यापासून सायंकाळी 7:45 सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे, भुवनेश्वर येथील बीजू पटनायक विमानतळावरील सर्व उड्डाणे मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच दक्षिण पूर्व रेल्वेने देखील अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.
10:03 May 26
आज ओडिसामध्ये धडकणार यास..
कोलकाता/भुवनेश्वर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले यास चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ओडिशाच्या भद्रक जिल्हा आणि धामराच्या उत्तर, तसेच बालासोरच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार हे वादळ ताशी 130-140 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.
यास चक्रीवादळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास रौद्र रुप धारण केले आहे. यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने वादळाच्या प्रभावित क्षेत्रातील जवळपास १२ लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. भारतीय हवामान विभागाचे महानिदेशक एम. महापात्र यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महापात्र यांनी सांगितले की उत्तर पश्चिम आणि बंगालच्या खाडीत वादळाने रौद्र रुप धारण केले आहे. यास चक्रीवादळ उत्तर-उत्तर पश्चिम या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, बुधवारी हे वादळ ११ च्या सुमारास उत्तर ओडिशाच्या धमरा बंदराजवळ धडकण्याची शक्यता महापात्र यांनी व्यक्त केली आहे.